हा रस्ताच असाय की येथे पाहण्यास मिळतात डान्सिंग कार अन्‌ गाड्या ​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:31 AM2021-05-09T04:31:03+5:302021-05-09T04:31:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : डान्सिंग कार म्हटले की, आठवतो पीके चित्रपट. पण इथे तर रोजच रस्त्यावर डान्सिंग करणाऱ्या ...

This is the only road where you can see dancing cars and cars | हा रस्ताच असाय की येथे पाहण्यास मिळतात डान्सिंग कार अन्‌ गाड्या ​

हा रस्ताच असाय की येथे पाहण्यास मिळतात डान्सिंग कार अन्‌ गाड्या ​

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ब्राह्मणपुरी : डान्सिंग कार म्हटले की, आठवतो पीके चित्रपट. पण इथे तर रोजच रस्त्यावर डान्सिंग करणाऱ्या कार आणि गाड्या पाहण्यास मिळतात. कारण तसे जरा वेगळेच असून, याला जबाबदार प्रशासनाचे दुर्लक्ष आणि निकृष्ट दर्जाचे काम आहे. यामुळे दरा फाटा ते म्हसावद रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना डान्सिंग कारचा अनुभव येतोच.

म्हसावद रस्त्याची गेल्या अनेक महिन्यांपासून अक्षरशः वाट लागली आहे. या रस्त्यावर जागोजागी लहान-मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यानेच हा सर्व रस्ता खराब होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी हाेत आहे. आता पावसाळ्यात तर या रस्त्यावर वाहन चालविणे धोक्याचे बनणार आहे. त्यामुळे या सर्व रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

म्हसावद ते सुलवाडे या रस्त्याची अवस्थाही अत्यंत बिकट झाली आहे. मध्य प्रदेशला हा रस्ता जोडला गेला आहे. या रस्त्याचे सुलवाडे गावापर्यंत तीनतेरा वाजले आहेत. सातपुड्यातील तसेच परिसरातील गावातील नागरिकांना म्हसावद हे गाव सोयीचे ठरत असून, येथे पोलीस ठाणे व ग्रामीण रूग्णालय आहे. त्यामुळे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. परंतु, म्हसावद येथे येण्याच्या विचार जर केला तर रस्ता पाहून अंगावर काटे येण्यासारखा अनुभव घ्यायला मिळत आहे. सध्या या रस्त्यावरून पायी चालणेदेखील कठीण झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी पंक्चर होते तसेच छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. या रस्त्यालगतच्या नवलपूरच्या नाल्यापासून ते आवगेपर्यंत तसेच ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्याची खडी वर आली आहे. या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

Web Title: This is the only road where you can see dancing cars and cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.