२८ गावांना एकच पशुचिकित्सक
By Admin | Updated: June 1, 2014 00:41 IST2014-06-01T00:41:17+5:302014-06-01T00:41:17+5:30
तळोदा तालुक्यातील बोरद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशु वैद्यकीय अधिकार्यांचे पद गेल्या दीड वर्षांपासून रिक्त आहे़

२८ गावांना एकच पशुचिकित्सक
गुलाबसिंग गिरासे ल्ल बोरद तळोदा तालुक्यातील बोरद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशु वैद्यकीय अधिकार्यांचे पद गेल्या दीड वर्षांपासून रिक्त आहे़ या रिक्त पदावर मोड पशु वैद्यकीय दवाखान्याचे पशु वैद्यकीय अधिकारी काम प्रभारी म्हणून काम पाहात आहेत़ प्रभारी पदभार सांभाळणार्या अधिकार्यावर मोड परिसरातील एकूण २८ गावांची जबाबदारी आहे़ परिणामी लसीकरण मोहिमेला अडचणी येत आहेत़ बोरदच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अखत्यारित मालदा, तुळाजा, बन, न्यु बन, धजापाणी, छोटा धनपूर, करडे, जुवानी, लाखापूर (फॉ) व (रेव्ह) बोरद, कलमाडी आदींसह इतर गावांचा समावेश आहे़तर मोड दवाखान्याला मोड, कढेल, आष्टे, मोहिदा,कळमसरे, खरवड,तºहावद, खेडले आदीसह गावांचा समावेश आहे़ या गावांमध्ये बोरद दवाखान्याला जोडलेली सुमारे ८० टक्के गावेही सातपुड्यातील आहेत़ येथील पशुपालक पायी प्रवास करून दवाखान्यात येतात़ परंतु अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याने त्यांना ताटकळत बसावे लागते़ या गावांमध्ये प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्या, गायी व गावराणी कोंबड्याचे मोठ्या प्रमाणावर पालन केले जाते़ बोरदला अधिकारी नियुक्त झाल्यास दुर्गम भागातील पशुपालकांच्या समस्या सुटणार आहेत़ तळोदा तालुक्यातील बोरद येथील पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चे पशु वैद्यकीय अधिकारी यांची दीड वर्षांपूर्वी बदली झाल्याने त्यांचा पदभार मोड दवाखान्याच्या अधिकार्याकडे देण्यात आला आहे़ दीड वर्ष उलटूनही जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून या पदावर नवीन अधिकार्याची नियुक्ती होत नसल्याने एकाच अधिकार्यावर मोड दवाखान्याची दहा व बोरद दवाखान्याच्या १८ गावांची जबाबदारी आली आहे़ पशुसंवर्धन विभागाची कामधेनू दत्तक योजना दोन्ही पशुवैद्यकीय दवाखान्यात योग्यप्रकारे राबत नसल्याचे चित्र आहे़ ही योजना पशुपालकांच्या फायद्याची आहे़ यामुळे गुरांचे पावसाळ्यापूर्वीचे लसीकरण रखडत होत असल्याचे चित्र आहे़ गुरांना पावसाळ्यात होणार्या घटसर्प, फर्या, लाळी खुरगतसह विविध आजारांवर लस देण्यासाठी सध्या पशुपालकांची लगबग सुरू आहे़ पशुसंवर्धन विभागाने बोरद पशुवैद्यकीय दवाखान्यात रिक्त असलेल्या पदावर अधिकार्याची नेमणूक करण्याची मागणी वारंवार करूनही कारवाई होत नसल्याने नाराजी आहे़