शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

एकाधिकार खरेदी केंद्रात अवघे हजार क्विंटल धान्य आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी विकास महामंडळाने आदिवासी शेतक:यांचे भरड धान्य खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात 19 खरेदी केंद्रे सुरु ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास महामंडळाने आदिवासी शेतक:यांचे भरड धान्य खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात 19 खरेदी केंद्रे सुरु केली आहेत़ 23 दिवस उलटूनही या केंद्रांवरची आवक तुरळक असून अद्याप केवळ 1 हजार क्विंटल धान्य आवक झाली आह़े यातून केंद्रांबाबत शेतक:यांमधील उदासिनता स्पष्ट होत आह़े1 नोव्हेंबरपासून आदिवासी विकास महामंडळांने भरड धान्य केंद्रांना सुरुवात केली होती़ यात आजअखेरीस 1 हजार 159 क्विंटल धान्याची आवक झाली आह़े यात 1 हजार 90 क्विंटल ज्वारी तर 129 क्विंटल 68 किलो मकाचा समावेश आह़े 31 डिसेंबर्पयत ही केंद्रे सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्ह्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे उत्पादनात घट आल्याने शेतक:यांनी धान्य साठा करण्यावर भर दिला होता़ यातून दिवाळीपूर्वी सर्व खरेदी केंद्रे ओस पडल्याचे दिसून आल़े दिवाळीनंतर केंद्रांमध्ये व्यवहारांना वेग येण्याची अपेक्षा महामंडळाकडून वर्तवण्यात आली होती़ याला अल्पप्रतिसाद मिळाल्याचे समोर आलेल्या धान्य आवकच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आह़े दिवाळीपूर्वी आणि नंतर काही शेतक:यांनी आणलेले धान्य हे एफक्यू दर्जाचे नसल्याचे सांगत काही ठिकाणाहून शेतक:यांना परत पाठवण्यात आले होत़े याचाही परिणाम आवकवर झाल्याचे सांगण्यात आले आह़े विशेष म्हणजे केंद्रात करावयाची ऑनलाईन नोंदणी आणि इतर बाबींच्या पूर्ततेमुळे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी धान्य देण्याबाबत असमर्थता दर्शवत आहेत़ यातून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याची आवक दिवसेंदिवस वाढत असून महामंडळाच्या खरेदी केंद्रांची स्थिती बिकट होत आह़े नंदुरबार तालुक्यात वावद, टोकरतलाव, लोणखेडा, नटावद, धानोरा, नवापूर तालुक्यात नवापूर, कोठडा, चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा, तळोदा तालुक्यात प्रतापपूर, शिव्रे, अक्कलकुवा, खापर, मोलगी, धडगाव तालुक्यात धडगाव, चुलवड, मांडवी, शहादा तालुक्यात मंदाणा आणि कजर्त अशा 19 खरेदी केंद्रांची निर्मिती केली आह़े या केंद्रांमध्ये ज्वारी 2 हजार 430, बाजरी 1 हजार 950 तर मका 1 हजार 700 रूपयांना खरेदी करण्यात येत आह़े या केंद्रांमध्येच धानची खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होत़े परंतू तूर्तास एकाही शेतक:याने धान विक्रीसाठी आणलेला नसल्याची माहिती देण्यात आली आह़े