जलयुक्तच्या कामांची केवळ औपचारिकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:36 IST2019-05-09T11:36:29+5:302019-05-09T11:36:51+5:30
गेल्या वर्षाची कामे अपुर्ण : दुष्काळ संधी समजून कामांना प्राधान्य द्यावे

जलयुक्तच्या कामांची केवळ औपचारिकता
नंदुरबार : गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्तची कामे थंड पडली आहेत. यंदा दुष्काळी स्थिती असतांना नेमके जलयुक्त आहे कुठे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. याउलट अवघ्या दोन तालुक्यांपुरते मर्यादीत असलेल्या पाणी फाऊंडेशनच्या कामांची सध्या जिल्हाभरात चर्चा आहे. गेल्यावर्षी १८० गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले, परंतु अनेक कामे अद्यापही पुर्ण झालेली नाहीत तर यंदा २०६ गावांमध्ये ते राबविले जाणार आहे.
चार वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात झाली. पहिल्या वर्षी ७० गावांची निवड करण्यात आली होती. आहे त्या तलावांचा गाळ काढणे, खोलीकरण करणे, सिमेंट बांध, कच्चा बांध बांधणे, रिचार्जशाप्ट, कुपनलिका पुनर्रभरण, शेततळे करणे, गॅबीयन बंधारे यासह इतर जलसंधारणाची कामे या योजनेअंतर्गत करण्यात येत होती. त्यासाठी तालुकानिहाय गावांची निवड करण्यात येते. पहिल्या वर्षी ७० तर दुसऱ्या वर्षी ७६ गावांची निवड करण्यात आली होती. नंतर या गावांची संख्या वाढत गेली. यंदाच्या वर्षाला २०६ गावांची निवड या योजनेअंतर्गत होणाºया कामांसाठी करण्यात आली आहे.
सुरुवातीला प्रतिसाद
पहिल्या दोन वर्षी बºयापैकी प्रतिसाद मिळाला. पहिल्या वर्षी स्वत: मुख्यमंत्र्यांनी येवून या कामांची पहाणी केली होती. दुसºया वर्षीही चांगला प्रतिसादर राहिला. मात्र, तिसºया वर्षापासून गावांची संख्या वाढली आणि कामांचा दर्जा घसरला. गेल्या वर्षी १८० गावांची निवड करण्यात आली होती. पैकी या गावांच्या कामे अद्यापही पुर्ण झालेली नाहीत. त्यातच आता २०१९-२० च्या कामांना सुुरुवात होत आहे.
जलयुक्त शिवार अभियानात गावे निवडतांना पहिल्या दोन वर्षात मोजकेच गावे निवडली जात होती. त्यामुळे अनेक गावांची इच्छा असूनही त्यांना या अभियानात सहभागी होता येत नव्हते.
झालेल्या कामांचे आॅडीट व्हावे
जलयुक्तमध्ये झालेल्या कामांचे आॅडीट करण्याची मागणी वेळोवेळी अनेक संघटनांनी केली होती. पहिल्या व दुसºया वर्षी झालेल्या कामांची स्थिती काय आहे. किती सातत्य त्यात राहिले या बाबीही पडताळून पहाणे आवश्यक ठरणार आहे. नाही तर केवळ योजना राबवयाची असे प्रकार सुरू आहे. दुसरीकडे पाणी फाऊंडेशनने नंदुरबार व शहादा तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत कामांना सुरुवात केली आहे. त्यातील लोकसहभाग लक्षणीय ठरत आहे. परिणामी जलयुक्तीची कामात केवळ निधी खर्च करणे एवढेच उद्दीष्ट राहिल्याचे बोलले जात आहे.