तळोद्यात लॉकडाऊनमुळे अक्कलकुवा आगारातून सुटणारी एकमेव बसही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:51 IST2020-06-20T12:47:49+5:302020-06-20T12:51:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा आगारातून नंदुरबार शहरासाठी सुरु केलेली एकमेव बसफेरी तळोदा शहरात वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आणखी ...

तळोद्यात लॉकडाऊनमुळे अक्कलकुवा आगारातून सुटणारी एकमेव बसही बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा आगारातून नंदुरबार शहरासाठी सुरु केलेली एकमेव बसफेरी तळोदा शहरात वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आणखी पाच दिवस बंद राहणार आहे़ गुजरात राज्य मार्गाने प्रवास शक्य नसल्याने ही बस तळोदा मार्गाने हातोडा पुलावरुन नंदुरबारकडे येत होती़
२२ मार्च पासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अक्कलकुवा एसटी आगारातून एकही बस सुटलेली नव्हती़ १ जूननंतर आगारातून नंदुरबार शहरासाठी एकमेव बसफेरी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ यातून नंदुरबार ते अक्कलकुवा ही बस तळोदा मार्गाने सुरु करण्यात आली होती़ बसमुळे आरोग्य, महसूल, पोलीस कर्मचारी तसेच वयोवृद्ध प्रवाशांची सोय झाली होती़ मात्र नंदुरबार पाठोपाठ तळोदाही तीन दिवस बंद ठेवण्यात आल्याने ही बस बंद करण्याचा निर्णय आगाराने घेतला होता़ शनिवारी ह्या बसच्या दोन फेऱ्या सुरु होण्याची शक्यता होती़ परंतू तळोदा पाच दिवस बंद असल्याने ही बस सुरु होण्याची शक्यता मावळली आहे़ दरम्यान अक्कलकुवा आगारातून सर्वाधिक बसेस बसेस ह्या सातपुड्याच्या दुर्गम भागात चालवल्या जातात़ दरदिवशी किमान २५२ बसफेºया ह्या मोलगी, धडगाव, वडफळी यासह दुर्गम भागातील इतर गावापाड्यांवर करण्यात येतात़ परंतू गेल्या तीन महिन्यापासून या बस फेºया होवू शकल्या नाहीत़ लॉकडाऊनला शिथिलता दिल्यानंतर दुर्गम भागात बसेस सुरु होण्याची शक्यता होती़ परंतू अक्कलकुवा आगाराला याबाबत कोणत्याही प्रकारचे आदेश देण्यात आलेले नाहीत़ आगारात ९६ चालक, ९६ वाहक, ५० यांत्रिकी कर्मचारी, १२ लिपिकवर्गीय कर्मचारी, १० वाहतूक नियंत्रक, पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ हे सर्व कर्मचारी नियमित हजेरी देत पुढील आदेशांची दरदिवशी वाट बघत आहेत़ आगाराचे दर दिवसाचे उत्पन्न हे साडेचार लाख रुपये असून तीन महिन्यात चार कोटी रुपयांचे नुकसान आगाराला सहन करावे लागले आहे़