दक्षतेसाठी ओळखीच्यांनाच सलूनमध्ये दिला गेला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:15 IST2020-06-29T12:15:25+5:302020-06-29T12:15:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत जिल्ह्यातील सलून दुकाने, ब्युटी पार्लर करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी ...

Only acquaintances were admitted to the salon for vigilance | दक्षतेसाठी ओळखीच्यांनाच सलूनमध्ये दिला गेला प्रवेश

दक्षतेसाठी ओळखीच्यांनाच सलूनमध्ये दिला गेला प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत जिल्ह्यातील सलून दुकाने, ब्युटी पार्लर करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आदेशान्वये परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर रविवारी जिल्ह्याच्या विविध भागातील सलून दुकाने सुरळीतपणे सुरु झाली होती़ नंदुरबार शहरातील विविध भागात सकाळी ९ वाजेपासून सुरु झालेल्या दुकानांमध्ये दक्षता म्हणून केवळ ओळखीच्यांनाच प्रवेश देत केस कापून देण्यात येत होते़
सूलन आणि ब्युटीपार्लरमध्ये केवळ केस कापणे, हेअर डाईंग, वॅक्सींग आणि थ्रेडींग इत्यादी सेवांना परवानगी देण्यात आली होती़ जिल्हाधिकारी यांनी शनिवारी काढलेल्या आदेशांचे रविवारपासून पालन सुरु करण्यात आले़ प्रामुख्याने सर्वच व्यावसायिकांनी डिस्पोजन वस्तूंचा वापर केला होता़ बहुतांश ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखते यावे अशी व्यवस्था करण्यात आली होती़ नाभिक दुकानादार संघटनेने सलून दुकाने सुरु करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत रविवारी सकाळी दुकाने सुरु करण्यापूर्वी सॅनेटायझेशन करण्यावर भर दिला होता़ तब्बल तीन महिन्यांपासून बंद असलेली दुकाने सुरु करताना व्यावसायिकांनी आधी स्वच्छतेला महत्त्व दिल्याचे जागोजागी दिसून आले होते़ कोरोना संसर्गजन्य असल्याने त्या संबधीच्या उपाययोजना काय, आणि कशा कराव्यात याबाबत नाभिक दुकानदार संघटनेकडून रात्री उशिरापर्यंत सोशल मिडिया ग्रुपच्या माध्यमातून माहिती देण्यात येत होती़ ज्या व्यावसायिकांकडे अँड्रॉईड फोन नव्हता त्यांना प्रत्यक्ष फोन करुन उपाययोजना सांगण्यात आल्या़ यात प्रामुख्याने गरजेचे असलेले ग्लोव्हज अप्रॅन, सॅनेटायझर सकाळी कुठे मिळेल याबाबत माहिती देऊन व्यवस्था करण्यात आली़
सर्व तयारी करुन ग्राहकांसाठी दुकाने सुरु करताना काही ठिकाणी माहिती फलकही लावण्यात आले होते़ ग्राहक बसण्यापूर्वी आणि केस कापल्यानंतरही सॅनेटायझेशन करण्यावर भर देण्यात येत होता़ यातून पाच वाजेपासून मोजक्याच ग्राहकांना दुकानांमध्ये प्रवेश देत नाभिक बांधवांचे व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत़

नाभिक दुकानदार संघटनेचे नंदुरबार शहरात ३५० पेक्षा अधिक सभासद आहेत़ त्यांनी विविध सूचनांचे पालन करत आज व्यवसाय सुरु केले़ यात डिस्पोजल अ‍ॅप्रन, रुमाल आणि वस्तारा यांचा वापर केला गेला़
दुकानांमध्ये गर्दी होणार असल्याचे लक्षात घेत काहींनी ग्राहकांना फोन करुन येण्याबाबत सुचवले़
४नाभिक बांधवांनी हातात ग्लोव्हज, तोंडावर मास्क, डोक्यावर कापड गुंडाळत दक्षता घेत केवळ कटींग करुन दिली़

बऱ्याच ठिकाणी ग्राहकांकडून दाढी करण्याचा आग्रह करण्यात आला़ त्याला सूलन दुकानदारांनी नकार दिला होता़ तोंडावर मास्क न काढता अनेकांची कटींग उरकण्यात आली़ ग्राहकाचा यादरम्यान मास्क निघू नये म्हणून चिकटपट्टी लावली गेली होती़
कोणत्याही प्रकारची दरवाढ शहर किंवा जिल्ह्यातील सलून दुकानात करण्यात आली नाही़

Web Title: Only acquaintances were admitted to the salon for vigilance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.