केवळ 800 शेतक:यांच्या खात्यावर भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:37 IST2019-11-26T12:36:55+5:302019-11-26T12:37:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवकाळी पावसामुळे 10 हजार शेतक:यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाले होत़े पंचनाम्यानंतर शासनाने जाहिर केलेल्या ...

केवळ 800 शेतक:यांच्या खात्यावर भरपाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अवकाळी पावसामुळे 10 हजार शेतक:यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाले होत़े पंचनाम्यानंतर शासनाने जाहिर केलेल्या भरपाईतील 1 कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्रशासनाला प्राप्त झाला होता़ या रकमेच्या वितरणाला सुरुवात झाली असली तरी सोमवारी पहिल्या दिवशी पाच तालुक्यातील 787 शेतक:यांच्या खात्यांवर भरपाईची रक्कम वर्ग झाल्याची माहिती देण्यात आली आह़े
महसूल विभागाकडून सोमवारी यासंदर्भात कारवाई पूर्ण करण्यात आली़ यात 787 शेतक:यांच्या बँक खात्यांवर 44 लाख 15 हजार 920 रुपये जमा करण्यात आले आहेत़ जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतक:यांनी संख्या जास्त असून मिळालेली रक्कम ही तुटपुंजी आह़े यामुळे शासनाकडे दुस:या टप्प्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आह़े लवकरच दुस:या टप्प्यातील रक्कमही प्राप्त अशी माहिती आह़े
कोरडवाहू क्षेत्रासाठी 8 तर बागायती पिकांसाठी 18 हजार रुपये प्रती हेक्टर मदत जाहिर झाली होती़ यांतर्गत नंदुरबार तालुक्याला 4 लाख 50 हजार, नवापुर 27 लाख 21 हजार 500, शहादा 27 लाख 21 हजार 500, तळोदा 40 हजार, अक्कलकुवा 27 लाख 21 हजार 500 आणि धडगाव तालुक्यासाठी 27 लाख 21 हजार 500 रुपये असे एकूण 1 कोटी 13 लाख 76 हजार रुपयांचे अनुदान गेल्या आठवडय़ात प्राप्त झाले होत़े या अनुदानाचे वितरण करण्यासंबधी तहसीलदारांना पत्र देण्यात आले होत़े त्यानुसार पाच तालुक्यांमध्ये रकमेचे वितरण झाले आह़े जिल्ह्यात 10 हजार 885 शेतक:यांच्या 5 हजार 818 हेक्टर पिकांचे नुकसान झाले होत़े यात 787 शेतक:यांना मदत वाटप झाल्याने उर्वरित 10 हजार 100 शेतक:यांना 65 लाखांचे शिल्लक अनुदान पुरेसे होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आह़े
जिल्हा प्रशासनाने शहादा, तळोदा, नंदुरबार, नवापुर आणि धडगाव तालुक्यातील 787 शेतक:यांना अनुदान दिले आह़े अक्कलकुवा तालुक्याचे बिल उद्या टाकले जाऊन गुरुवारपासून तेथील नुकसानग्रस्तांना भरपाई वाटप होईल अशी माहिती देण्यात येत आह़े