नंदुरबार जिल्ह्यात केवळ ६०० ॲाक्सीजन बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST2021-03-29T04:18:18+5:302021-03-29T04:18:18+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात शासकीय व खाजगी मिळून ६०० ॲाक्सीजन बेड असून त्यापेक्षा अधीक रुग्णांना त्याची गरज पडत असल्याने बेडसाठी ...

नंदुरबार जिल्ह्यात केवळ ६०० ॲाक्सीजन बेड
नंदुरबार : जिल्ह्यात शासकीय व खाजगी मिळून ६०० ॲाक्सीजन बेड असून त्यापेक्षा अधीक रुग्णांना त्याची गरज पडत असल्याने बेडसाठी वेटींग करावी लागत आहे. काही गंभीर रुग्णांना सुरत येथे हलवावे लागत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात दररोज ३००पेक्षा अधीक जम्बो ॲाक्सीजन सिलिंडर लागत आहे. परंतु अडीचशे पर्यंत उपलब्ध होत आहे. त्यात नंदुरबारातील प्लान्टमध्ये १२५ सिलिंडर तर धुळे येथून १२५ सिलिंडर उपलब्ध होत आहे. त्यामुळे तातडीने ॲाक्सीजन निर्मितीचा दुसरा प्लान्टची निर्मिती सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे बेड उपलब्ध होत नाहीत. जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्येही तीच स्थिती आहे. ही बाब लक्षात घेता रुग्ण सरळ सुरत गाठत आहेत. तेथेही आधीच बेड आरक्षीत करावा लागत आहे. त्यात रुग्णांचा वेळ व पैसाही जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, ॲाक्सीजन अभावी रुग्णाचा मृत्यू होण्याची घटना अद्याप जिल्ह्यात घडलेली नाही.