वृध्द कलावंत मानधन योजनेचे केवळ 35 अर्ज मंजूर

By Admin | Updated: June 18, 2017 17:11 IST2017-06-18T17:11:23+5:302017-06-18T17:11:23+5:30

कागदपत्रांच्या त्रुटींमुळे जिल्ह्यातील वृध्द कलावंताना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आह़े

Only 35 applications of old artist mantra scheme approved | वृध्द कलावंत मानधन योजनेचे केवळ 35 अर्ज मंजूर

वृध्द कलावंत मानधन योजनेचे केवळ 35 अर्ज मंजूर

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.18 - कागदपत्रांच्या त्रुटींमुळे जिल्ह्यातील वृध्द कलावंताना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आह़े जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे जिल्हाभरातून 144 अर्ज आले असून पैकी, केवळ 35 अर्ज पूर्ण आहेत़ उर्वरीत 109 अर्जामध्ये कागदपत्रांची त्रुटी पडले आहेत.
गेल्या तीन वर्षापासून वृध्द  कलावंतांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी स्थापन करण्यात करण्यात आलेल्या समितीचे पुनर्गठन झाले नसल्याने तीन वर्षापासून वृध्दकलावंताचे अर्ज व प्रक्रिया रखडलेली होती़ संबंधित विभागाकडून या योजनेबाबत जनजागृती करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े 
राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन ही योजना राज्य शासनामार्फत 1954 पासून राबविण्यात येत आह़े  त्यानुसार अ वर्ग प्राप्त वृध्द  कलावंताना 25 हजार रुपये, ब वर्ग कलावंताना 21 हजार 600 तर, क वर्ग कलावंताना 18 हजार रुपये वार्षिक मानधन देण्यात येत असत़े त्यामुळे त्यांना आपला उदनिर्वाह करणे सोयीचे ठरत असत़े परंतु शासनाकडून अर्जा सोबत जोडण्यात येत असलेल्या कागदपत्रांच्या त्रुटींमुळे जिल्ह्यातील बहुसंख्य वृध्दकलावंताना योजनेच्या लाभापासून मुकावे लागत आह़े 

Web Title: Only 35 applications of old artist mantra scheme approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.