जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार जिल्ह्यात होताहेत केवळ २५ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:45 IST2020-07-30T12:44:54+5:302020-07-30T12:45:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या आणि एकुणच लॉकडाऊनच्या काळात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार अवघ्या २५ टक्यांवर आले आहेत. त्यामुळे ...

Only 25 per cent of land transactions take place in the district | जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार जिल्ह्यात होताहेत केवळ २५ टक्केच

जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार जिल्ह्यात होताहेत केवळ २५ टक्केच

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या आणि एकुणच लॉकडाऊनच्या काळात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार अवघ्या २५ टक्यांवर आले आहेत. त्यामुळे मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून मिळणारा लाखो रुपयांचा महसूलला शासनाला मुकावे लागत आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांचा रोजगार गेला आहे. आर्थिक उलाढालीवर देखील परिणाम झाला आहे. इतर व्यवहारांप्रमाणेच जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर देखील परिणाम झाला आहे. नंदुरबारातील उपनिबंधक कार्यालयात पूर्वीप्रमाणे गर्दी दिसून येत नाही. मार्च महिन्यापासून हा परिणाम दिसून येत असल्याचे उपनिंबध कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले.
नवीन खरेदी-विक्रीचे व्यवहार अगदीच तुरळक आहेत. आता जे व्यवहार होत आहेत ते गहाणखत किंवा जुने व्यवहार होत आहेत. या माध्यमातून मुद्रांक शुल्काद्वारे शासनाला मिळणारा महसूलाावरही परिणाम झाला आहे.
नंदुरबारात अनेक लॅण्ड डेव्हलपर्स आहेत. त्यांच्या माध्यमातून किंवा वैयक्तिकरित्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जात असतात. यामुळे स्टँप वेंडर यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Only 25 per cent of land transactions take place in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.