43 ग्रामपंचायतींसाठी केवळ 21 अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:28 PM2019-11-22T12:28:15+5:302019-11-22T12:28:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रमांतर्गत 54 रिक्त जागांसाठी 21 नामनिर्देशन दाखल झाले आहेत़ या ...

Only 21 applications were filed for 43 Gram Panchayats | 43 ग्रामपंचायतींसाठी केवळ 21 अर्ज दाखल

43 ग्रामपंचायतींसाठी केवळ 21 अर्ज दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रमांतर्गत 54 रिक्त जागांसाठी 21 नामनिर्देशन दाखल झाले आहेत़ या निवडणूक प्रक्रियेकडे अनेकांनी पाठ फिरवल्याने निवडणूक निर्णय अधिका:यांचे तहसील कार्यालयांमध्ये निर्माण करण्यात आलेले कक्ष पूर्णपणे ‘सुनसान’ होत़े  
शहादा तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीतील 27, नंदुरबार 10 ग्रामपंचायतीचे 13,नवापुर तालुक्यात 1 ग्रामपंचायतीत 1, अक्कलकुवा तालुक्यात सहा ग्रामपंचायतींमध्ये सहा, तळोदा तालुक्यात 3 ग्रामपंचायतींमध्ये 6 तर धडगाव तालुक्यात 3 ग्रामपंचायतींमध्ये 3 सदस्यांची पदे रिक्त आहेत़ या साठी शासनाकडून पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आह़े यांतर्गत गुरुवारी दुपारी 3 वाजेर्पयत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती़ या मुदतीअंती शहादा येथे 27 जागांसाठी केवळ 1, नंदुरबार येथे 13 जागांसाठी 5, नवापुर येथे 1, तळोदा व धडगाव येथे प्रत्येकी 1 नामनिर्देशन दाखल झाले आह़े  
या अर्जाची छाननी शुक्रवारी करण्यात येणार आह़े परंतू 54 जागांसाठी केवळ 21 अर्ज आल्याने उर्वरित 33 जागा पुन्हा रिक्त राहणार आहेत़ 

शहादा तालुक्यात सर्वाधिक 20 ग्रामपंचायतींच्या 27 जागांसाठी केवळ एकच अर्ज दाखल झाला आह़े तालुक्यात यापूर्वीही ग्रामपंचायत निवडणूक आणि पोटनिवडणूक कार्यक्रम राबवला गेला आह़े परंतू तेव्हाही अजर्च दाखल झालेला नाही़  यातील सर्वच ग्रामपंचायतींचा कालावधी येत्या वर्ष-दोन वर्षात पूर्ण होणार आह़े
 

Web Title: Only 21 applications were filed for 43 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.