रांझणीत सूनेच्या निधनानंतर केवळ १८ दिवसातच सासूनेही त्यागले प्राण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 18:54 IST2019-04-12T18:54:32+5:302019-04-12T18:54:36+5:30

रांझणी : कुटुंबवत्सल असलेल्या सुनेच्या अकाली निधनामुळे धक्का बसलेल्या सासुनेही केवळ १८ दिवसातच आपलेही प्राण त्यागले़ ही मन हेलावणारी ...

 Only 18 days after the demise of Ranjit, the mother-in-law has lost her life ... | रांझणीत सूनेच्या निधनानंतर केवळ १८ दिवसातच सासूनेही त्यागले प्राण...

रांझणीत सूनेच्या निधनानंतर केवळ १८ दिवसातच सासूनेही त्यागले प्राण...

रांझणी : कुटुंबवत्सल असलेल्या सुनेच्या अकाली निधनामुळे धक्का बसलेल्या सासुनेही केवळ १८ दिवसातच आपलेही प्राण त्यागले़ ही मन हेलावणारी घटना तळोदा तालुक्यातील रांझणी येथे घडली़
रांझणी येथील पाचोरे कुटुंबियांवर हा आघात झाला़ पाचोरे कुंटुंबियांची सून मिराबाई अंबालाल पाचोरे यांचे गेल्या महिन्यात १९ तारखेला अकाली निधन झाले होते़ याचा धसका मिराबाई यांच्या सासू शांताबाई पाचोरे यांनी घेतला़ सूनेच्या निधनापासून त्यांची प्रकृती पूर्णपणे खालावली असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले़ दिवसेंदिवस प्रकृती खालावत जात असल्याने अखेर ६ एप्रिल रोजी त्यांचेही निधन झाले़ त्यामुळे पाचोरे कुटुंबियांवर दुखाचा डोेंगरच कोसळला असल्याच्या भावना गावातून व्यक्त करण्यात येत आहेत़ अतीशय मितभाषी असलेल्या मिराबाई यांच्या जाण्यामुळे घरात निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन न निघण्यासारखी असल्याचे मिराबाई सांगत असत़

Web Title:  Only 18 days after the demise of Ranjit, the mother-in-law has lost her life ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.