शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
2
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
3
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
4
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
5
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
6
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
7
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
8
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
9
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
10
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
11
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
12
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
13
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
14
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
15
गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू
16
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
17
‘गंभीर’ बट्ट्याबोळ वेळीच आवरा! भारतीय क्रिकेटची अशी पत घालवणे जास्त भयंकर अन् अक्षम्य
18
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
19
पोकळ बडबड करून भाजप, मोदींशी कसे लढता येईल?; कातडीबचाव आघाड्या दूर साराव्या लागतील
20
सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ 14 टक्के शेतक:यांनाच पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावसाअभावी दुष्काळात तेरावा महिना भोगणा:या शेतक:यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध शाखांनी कर्जासाठी ताटकळत ठेवल्याने त्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पावसाअभावी दुष्काळात तेरावा महिना भोगणा:या शेतक:यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध शाखांनी कर्जासाठी ताटकळत ठेवल्याने त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आह़े नियोजनाचा अभाव आणि ढिसाळ अशा कामकाजामुळे राष्ट्रीयकृत बँका जून महिना संपूनही केवळ 14 टक्के शेतक:यांना कजर्वाटप करु शकल्या आहेत़      एकीकडे राष्ट्रीयकृत बँका शेतक:यांना कर्जापासून वंचित ठेवत असताना दुसरीकडे जिल्हा बँकेने 97 टक्के पात्र खातेदारांना 41 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करुन 73 टक्के मजल मारली आह़े विशेष म्हणजे जिल्हा बँकेचे कर्ज वाटप हे एप्रिल अखेरीपासून सुरु झाले होत़े तर राष्ट्रीयकृत बँकाना मे महिन्यापासून कजर्वाटप करण्यात आदेश होत़े परंतू शेतक:यांची कजर्माफी आणि इतर बाबींच्या त्रुटी काढून राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतक:यांच्या कर्ज प्रस्तावांवर शेरे मारणे सुरु असल्याने कजर्वाटपाची गती संथावली आह़े जिल्ह्यातील 25 हजार पेक्षा अधिक शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेसाठी पात्र ठरले होत़े यातून त्यांचा पीककर्जासाठीचा मार्गही मोकळा झाला होता़ यंदाच्या खरीप हंगामासाठी लीड बँकेने 9 राष्ट्रीयकृत, तीन खाजगी आणि दोन सहकारी बँकांना 72 हजार शेतक:यांना कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्टय़ दिले होत़े परंतू जून संपल्यानंतरही बँकांनी केवळ 10 हजार शेतक:यांना कर्ज पुरवठा केल्याचे समोर आले आह़े जिल्ह्यातील विविध भागातील 9 राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखांमधून 44 हजार, खाजगी बँकांकडून 6, ग्रामीण बँकेंकडून 1 हजार तर सहकारी बँकेने किमान 5 हजार शेतक:यांना कर्ज वाटप करण्याचे लीड बँकेने मे महिन्यात उद्दीष्टय़ वाटप करताना स्पष्ट करुनही राष्ट्रीयकृत बँकांच्या संथगतीने होणा:या कजर्वाटपाला गती मिळणार कधी असा, प्रश्न समोर येत आह़े गेल्या जून महिन्यात खाजगी बँकांनी 39 तर ग्रामीण बँकेनेही 17 टक्के शेतक:यांर्पयतच पीककर्जा पोहोचवल्याची माहिती देण्यात आली आह़े 

खरीप 2019 मध्ये 58 हजार 334 शेतक:यांना उर्वरित 14 हजार 582 शेतक:यांना रब्बी हंगामात पीक कर्ज वाटप करण्याचे नियोजन होत़े खरीप हंगामातील कर्जातून 1 लाख 1 हजार 788 हेक्टर शेतीक्षेत्राला लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होत़े प्रत्यक्षात मात्र जून अखेर्पयत बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडून जिल्ह्यातील 4 हजार 165 शेतक:यांना 74 लाख 87 हजार रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आह़े जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांकडून अक्कलकुवा तालुक्यातील 8 हजार 914, धडगाव 5 हजार 619, नंदुरबार 17 हजार 799, नवापूर 12 हजार 391, तळोदा 6 हजार 546 तर शहादा तालुक्यात सर्वाधिक 21 हजार 647 अशा 72 हजार 916 शेतक:यांना 2019-20 या वर्षात पीककर्ज देण्याचे नियोजन केले गेले होत़े 

राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांकडून शेतकरी कर्ज वाटपाबाबत उदासिन भूमिका घेतली गेली असताना धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पात्र असलेल्या 5 हजार 539 शेतकरी सभासदांपैकी 5 हजार 329 शेतक:यांना 41 कोटी 93 लाख 11 हजार रुपयांचे कर्जाचे वाटप करण्यात आले आह़े यातून 8 हजार 305 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आह़े आजअखेरीस जिल्ह्यातील केवळ 210 सभासद शेतकरी कर्जापासून वंचित असून त्यांनाही जिल्हा बॅकेच्या 29 शाखांमधून कर्ज वितरण होणार असल्याची माहिती आह़े बँकेकडून शहादा सर्वाधिक 2 हजार, नंदुरबार 1 हजार 739, तर नवापुर तालुक्यातील 817 शेतक:यांना कर्ज वाटप झाले आह़े 235 पैकी 220 विकासोंना कर्ज दिले गेले आह़े