टंचाई कृती आराखडय़ातील केवळ 11 हातपंपच झाले पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:15 IST2019-04-09T12:14:33+5:302019-04-09T12:15:28+5:30
20 तात्पुरत्या योजना वेगात : विंधनविहिरी संकटात

टंचाई कृती आराखडय़ातील केवळ 11 हातपंपच झाले पूर्ण
नंदुरबार : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना कृती आराखडय़ांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 302 पैकी केवळ 11 हातपंपांची कामे पूर्ण झाली आहेत़ यातून प्रशासनाला असलेले दुष्काळाचे गांभिर्य समोर येत असून जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून गेल्या वर्षात मंजूर केलेले हातपंप यंदाच्या वर्षातही खोदले जात आहेत़
मार्च ते मे या तीन महिन्याच्या कालखंडात आखण्यात आलेल्या टंचाई निवारण कृती आराखडय़ानुसार जिल्ह्यात 20 तात्पुरत्या पाणी योजना आणि 302 हातपंप मंजूर करुन निधी वर्ग केला गेला होता़ मे ते मार्च या आराखडय़ानुसार ग्रामपंचायतींच्या प्रस्तावांना तात्त्काळ मंजूर देऊन कामांना सुरुवात करण्याचे आदेश होत़े परंतू मार्च महिन्यापासून जिल्ह्यात केवळ तात्पुरत्या पाणी योजनांनाच गती दिली गेली असून हातपंपांची खोदाई मात्र अध्यार्वर आह़े याबाबत जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत तक्रारी करण्यात आल्या होत्या़ ह्या तक्रारी होत असतानाच गेल्या वर्षाच्या मंजूर विंधनविहिरींच्या खोदाईचा प्रश्नही समोर येत आह़े जून 2017 मध्ये कार्यादेश देण्यात आलेल्या 500 विंधनविहिरींसाठी मार्च 2018 मध्ये निधी दिला गेला असताना मे महिन्यात ठेकेदार नियुक्त करून कामांना सुरुवात झाली होती़ ऑक्टोबर 2018 महिन्यार्पयत ही कामे सुरू असणार असल्याचे सांगण्यात आले होत़े परंतू मार्च 2019 र्पयत खोदाई सुरु असल्याचा अहवाल ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे देण्यात आला आह़े यावर अधिका:यांनी ताशेरे ओढूनही साधनांची कमतरता असल्याचे कारण पुढे करुन वेळ मारुन नेली जात आह़े ठेकेदारांनी 60 फूट खोदल्यावर 12 ऐवजी 10 किंवा त्यापेक्षा कमी पाईप हातपंप बसवल्याच्या लेखी तक्रारी पंचायत समित्यांकडे दिल्या गेल्या आहेत़ पाणीटंचाईची झळ भोगणा:या 20 ग्रामपंचायतअंतर्गत गावांना टंचाई कृती आराखडय़ांतर्गत तात्पुरती पाणी योजना मंजूूर करण्यासाठी 2 कोटी 42 लाख 79 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ यांतर्गत नंदुरबार तालुक्यातील रनाळे, सातुर्के, उमर्दे बुद्रुक, खर्दे खुर्द, शिंदगव्हाण, उमर्दे खुर्द, नवी ओसर्ली, होळ तर्फे हवेली, कार्ली, न्याहली, बलदाणे, कानळदा, भालेर, निंभेल, टोकरतलाव आणि दुधाळे येथील पाणी योजनांना हिरवा कंदील देऊन कामांना सुरुवात झाली आह़े शहादा तालुक्यातील शेल्टीचा बर्डीपाडा, भोरटेक, कोळपांढरी तसेच नवापूर तालुक्यातील दापूर येथेही आलेल्या प्रस्तावानुसार तात्पुरती पाणी योजना मंजूर करुन कामे पूर्णत्त्वास आल्याची माहिती आह़े सर्वच कामांचे मंजूरी आदेश काढून निधी देण्यात आल्याची माहिती आह़े
एकीकडे तात्पुरत्या पाणी योजनांना गती देण्यात येत असताना दुसरीकडे हातपंप बांधणीकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले आह़े 2019 च्या टंचाई कृती आराखडय़ानुसार मार्च ते मे या तीन महिन्यासाठी 302 हातपंप मंजूर होत़े यात नंदुरबार 10, नवापूर 12, शहादा 88, तळोदा 26, अक्कलकुवा 26 आणि धडगाव तालुक्यात 135 हातपंप मंजूर करण्यात आले होत़े यातील केवळ 11 गेल्या महिन्यात पूर्ण झाले आहेत़ उर्वरित 291 हातपंप कधी पूर्ण होणार याची कोणतीही माहिती संबधित विभागाकडे उपलब्ध नाही़
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने 2017-18 या आर्थिक वर्षात 500 विंधनविहिरींच्या खोदाईसाठी 3 कोटी 38 हजार 58 हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता़ यातून 2018 डिसेंबर शेवटार्पयत 325 विंधन विहिरींच्या कामे प्रगतीपथावर होती़ परंतू त्यांच्यावर हातपंप टाकण्यास फेब्रुवारी 2019 उजाडला होता़ विशेष म्हणजे धडगाव तालुक्यात अद्यापही गेल्या वर्षाचे हातपंप टाकण्यात येत असल्याची माहिती आह़े विशेष म्हणजे गेल्या वर्षाच्या निधीनुसार धडगाव तालुक्यात 155,धडगाव 157 शहादा 62, तळोदा 52 नंदुरबार 28 तर नवापूर तालुक्यात 76 विंधन विहिरी मंजूर होत्या़ यातील पूर्ण विहिरींची स्थिती समोर आलेली नसल्याने टंचाई निवारण नावालाच असल्याचे चित्र आह़े