जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त ऑनलाईन चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:22 IST2021-05-31T04:22:47+5:302021-05-31T04:22:47+5:30
३१ मे हा संपूर्ण जगात तंबाखू विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व ...

जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त ऑनलाईन चर्चासत्र
३१ मे हा संपूर्ण जगात तंबाखू विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मेडिकल विभागाकडून ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. सचिन परब, डॉ. किरण पाटील, चेतना विसपुते आणि डॉ. विशाखा गर्गे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डॉ. सचिन परब यांनी तंबाखू सोडण्यासाठी दृढसंकल्पाची आवश्यकता, पंचसूत्रांचा अवलंब केल्यास निश्चितपणे तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून मुक्त होऊ शकत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी दरवर्षी १३ लाख आणि दररोज साडेतीन हजार लोकांचा तंबाखूने बळी जात असल्याची माहिती दिली.
चेतना नितीन विसपुते यांनी सात्त्विक आहार, योगासने, प्राणायाम आणि दररोज उगवत्या सूर्याकडे पाहून त्याची तांबडी किरणे आपल्यावर पडू द्यावी, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा आपल्यात येईल व आपणास व्यसनमुक्तीची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन केले.
प्रास्तााविक डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले. डॉ. विशाखा गर्गे यांनी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या तंबाखूमुक्तीच्या प्रतिज्ञेचे वाचन केले. ब्रह्माकुमारी मीनाक्षीदीदी यांनी स्वागत, तर डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सूत्रसंचालन केले.