बामखेडा महाविद्यालयात ऑनलाईन रस्ता सुरक्षा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST2021-02-11T04:33:50+5:302021-02-11T04:33:50+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील होते. कार्यक्रमास ग्रामविकास संस्थेचे सचिव बी.व्ही.चौधरी उपस्थित होते. प्रास्ताविक एनएसएस सहाय्यक अधिकारी प्रा. वाय. ...

Online road safety campaign at Bamkheda College | बामखेडा महाविद्यालयात ऑनलाईन रस्ता सुरक्षा अभियान

बामखेडा महाविद्यालयात ऑनलाईन रस्ता सुरक्षा अभियान

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील होते. कार्यक्रमास ग्रामविकास संस्थेचे सचिव बी.व्ही.चौधरी उपस्थित होते. प्रास्ताविक एनएसएस सहाय्यक अधिकारी प्रा. वाय. सी. गावित यांनी केले. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी कार्यक्रमास हजर होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक शिरसाठ यांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करून वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हेल्मेट वापरणे, परवान्या शिवाय वाहन न चालविणे, वेगावर नियंत्रण ठेवणे अशा वाहतुकीच्या नियमांचे विवेचन करून त्यांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल, हे उपस्थितांना पटवून सांगितले. प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील यांनी, भारतातील आणि राज्यातील अपघातांचे प्रमाण याचे विश्लेषण केले. वाहन चालविताना निरीक्षण, विविध क्रिया, अंदाज आणि निर्णय या चार गोष्टी अचूक असाव्यात. एकाही गोष्टीमध्ये उणीव असल्यास अपघात घडतो. सूत्रसंचालन डाॅ. करंके यांनी तर डाॅ. बी.एन.गिरासे यांनी आभार मानले.

Web Title: Online road safety campaign at Bamkheda College