नंदुरबारात वाहनांच्या ऑनलाईन नोंदण्यांची बोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 13:12 IST2018-04-11T13:12:26+5:302018-04-11T13:12:26+5:30

परिवहन विभागाचा भोंगळ कारभार : 15 हजार मालवाहू वाहने कराअभावी रस्त्यावर

Online registration of vehicles of vehicles in Nandurbar | नंदुरबारात वाहनांच्या ऑनलाईन नोंदण्यांची बोंब

नंदुरबारात वाहनांच्या ऑनलाईन नोंदण्यांची बोंब

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 11 : राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयात जुन्या व  नव्या वाहनांच्या नोंदी ऑनलाईन करून कर भरणा करून घेण्याचे  आदेश आहेत़ असे असतानाही नंदुरबार आरटीओ चलन काढून नियमबाह्य करांचा भरणा करण्याची सक्ती वाहनमालकांना करत           आहेत़ कर भरूनही वाहनांच्या नोंदण्या होणार किंवा कसे, याची माहिती नसल्याने वाहनामालकांमध्ये संभ्रम आह़े  
जिल्ह्यात तीन चाकी मालवाहू ते अवजड वाहनांचा कर त्रैमासिक किंवा वार्षिक पद्धतीने भरला जातो़ पूर्वीपासून चलन पद्धतीने भरणा करण्याची सक्ती प्रादेशिक परिवहन विभागाने केली होती़ मात्र आता राज्यस्तरावरून ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याची सक्ती सुरू झाली आह़े यासाठी वाहनमालकांकडून आरटीओ कार्यालयात भेटी दिल्यावर चलनद्वारे भरणा करण्याचे बजावण्यात  आल़े परंतु प्रादेशिक परिवहन विभागाकडे ऑनलाईन नोंदणी नसताना कर भरला जाईल कसा, असा प्रश्न आह़े यामुळे किमान 2 हजारापेक्षा अधिक मालवाहू वाहनधारकांचे विविध कर भरले गेलेले नसल्याचे स्पष्ट होत आह़े वाहनधारकांना वर्षभरात वाहनाच्या वजनाच्या हिशोबाने रस्ते कर  (रोड टॅक्स), प्रोफेशनल टॅक्ससह आठ वर्षे जुन्या वाहनांसाठी पर्यावरण कर भरण्याची सक्ती आह़े गेल्या 15 दिवसांपासून नवे आणि जुने वाहने असलेले  वाहनधारक सातत्याने नंदुरबार प्रादेशिक परिवहन विभागाच्या चकरा मारत आहेत़ यातील काहींनी सीएससी सेंटरवरून कर चलन काढण्याचा प्रयत्न केला परंतू नोंदण्याच नसल्याने गोंधळ उडाला आह़े 
विशेष म्हणजे रस्त्यावर धावणारी वाहने कर न भरल्याने बोगस दाखवून त्यांच्याकडून दंडवसुली करण्याचा नवा फंडा सुरू झाल्याने वाहनमालक व्हैराण आहेत़ दर दिवशी वाहनांचा दंड भरण्याची ऐपत नसल्याने वाहनांच्या ऑनलाईन नोंदण्या करण्यासंदर्भात मार्ग काढण्याची अपेक्षा व्यक्त होत आह़े जिल्ह्यात तीन चाकी, व्यावसायिक चारचाकी, अवजड वाहने, ढंपर, ट्रॅक्टर, क्रेन, कॉम्प्रेसर अशी विविध 15 हजार वाहने आहेत़ धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या या वाहनांसाठी वार्षिक कर ठरवून देण्यात आला आह़े 750 किलो वजनार्पयत असलेल्या तीन चाकी वाहनांना वार्षिक 2 हजार 500, 10 लाख किमतीच्या चारचाकी वाहनांना 9 टक्के, 10 ते 20 लाख र्पयतच्या वाहनांना 10 टक्के, 20 लाखांपेक्षा अधिक किंमत असणा:या वाहनांना 14 टक्के, 750 किलो ते 16 हजार 500 किलो वजन असणा:या वाहनांना 8 हजार 400 ते 12 हजार 150, जेसीबी दर्जाच्या 2 हजार 250 वजनी वाहनाला 6 हजार, टॅक्टर, क्रेन व कॉम्प्रेसर या वाहनांसाठी 6 हजार रूपयांचा कर भरणा वाहनमालकांना करावा लागतो़ यातही 8 वर्षे पूर्ण करणा:या तसेच नवीन वाहनांना पर्यावरण कराच्या रूपाने वाहनाच्या मूळ किमतीच्या 2़5 टक्के कर भरण्याची सक्ती आह़े बहुतांश वाहनमालक हे वार्षिक कर भरण्यास प्राधान्य देत असल्याने त्यांची सध्या फिरफिर सुरू आह़े ऑनलाईन नोंदण्या करण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उत्सुक नसल्याने वाहनमालकांच्या समस्यांमध्ये भर पडत आह़े 
 

Web Title: Online registration of vehicles of vehicles in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.