काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये पालक - शिक्षक संघाची ऑनलाईन सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST2021-08-01T04:28:10+5:302021-08-01T04:28:10+5:30
शासन निर्णय व शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार आठवी ते १० वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात पालकांशी चर्चा करण्यासाठी ...

काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये पालक - शिक्षक संघाची ऑनलाईन सभा
शासन निर्णय व शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार आठवी ते १० वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात पालकांशी चर्चा करण्यासाठी ऑनलाईन सभा घेण्यात आली. मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक व मार्गदर्शन केले. त्यात भौतिक सुविधा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना तपासणी, बैठक व्यवस्था, पालकाचे संमतीपत्र, वैयक्तिक स्वच्छता, कोरोना विषयी गैरसमज, विद्यार्थिनींची उपस्थिती, सुरक्षा, प्रवास, शाळेची वेळ, तासिका नियोजन व ऑनलाईन उपक्रम या संदर्भात मार्गदर्शन केले. चंद्रशेखर चौधरी यांनी मोफत पास योजना या विषयी पालकांना माहिती दिली.
सभेत पालकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. त्यात सरिता पेटकर, जगदीश घमंडे, पूजा थोरात, धनराज पाटील, काजल राजपूत, पांडुरंग गिरासे, पूजा मराठे, संजयकुमार पाटील, गुलाब पाटील, सी.सी. पाटील, दिनेश पाटील, संदीप गांगुर्डे, विशाल सोनार, वैशाली तंबोळी, वैशाली पाटील, रूपाली गीते, फकरुद्दीन खाटिक यांनी ग्रामीण विद्यार्थिनींना प्रवासाची अडचण, बस प्रवास अडचण, सामाजिक अंतर ठेवणे, नियमांचे पालन करणे, बैठक व्यवस्था, शाळेच्या गेटवर सॅनिटायझर ठेवणे, हात धुणे, थर्मल गन शाळेत असावी या विषयी सूचना केल्या. पालकांच्या सर्व शंकाचे समाधान मुख्याध्यापिकांनी केले. सभेत विद्यार्थिनींच्या शैक्षणिक विकासाकरिता सकारात्मक चर्चा घडवून आली. या सभेचे सूत्रसंचालन योगेशकुमार गवते तर आभार पर्यवेक्षक विपुल दिवाण यांनी मानले.