जुनी पेन्शन हक्क संघटनेची ऑनलाईन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST2021-05-11T04:32:08+5:302021-05-11T04:32:08+5:30

बैठकीत संघटनेच्या विविध बाबींवर चर्चा करण्यात येऊन एनपीएस खात्यांवर संपूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. तसेच विविध ...

Online meeting of the Old Pension Rights Association | जुनी पेन्शन हक्क संघटनेची ऑनलाईन बैठक

जुनी पेन्शन हक्क संघटनेची ऑनलाईन बैठक

बैठकीत संघटनेच्या विविध बाबींवर चर्चा करण्यात येऊन एनपीएस खात्यांवर संपूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. तसेच विविध विभागांमध्ये संघटनेच्या ध्येय धोरणांचा प्रसार व्हावा यावर चर्चा करण्यात आली. १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर असल्याची माहिती सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना कळावी यासाठी प्रत्येक विभागातून एक विभागप्रमुख निवडण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याअंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमधून डॉ. मंगेश वाघमारे यांची निवड करण्यात आली. राज्य समन्वयक राहुल पवार, उपाध्यक्ष शैलेंद्र रघुवंशी, गजानन मराठे, चंद्रकांत वाघ, चुडामन सरगर, प्रमोद राजपुत, सरचिटणीस तुषार सोनवणे, कार्याध्यक्ष अशोक बागले, कोषाध्यक्ष संदीप रोकडे, तालुकाध्यक्ष आदिनाथ गोल्हार, प्रवीण परदेशी, दयानंद जाधव, पंकज होडगर, धीरसिंग वसावे, प्रवीण मासुळे, वाघंबर कदम, ज्ञानोबा सुरनर, कमलेश राजपूत, यशवंत सूर्यवंशी, आबासाहेब अहिरे, तुकाराम अलट, सुनील पगारे, विशाल सिसोदे, प्रशांत बागुल, अनिल चिकटे, उपेंद्र पाटील, अविनाश डोंगर, कमलेश पाटील, धीरज खैरनार, रवींद्र पाटील, पंकज निकुंभे, दपक ठाकरे यांनी या ऑनलाईन सभेत सहभाग नोंदवला.

Web Title: Online meeting of the Old Pension Rights Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.