कृषी विज्ञान केंद्रात ऑनलाईन परसबाग प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST2021-05-21T04:31:28+5:302021-05-21T04:31:28+5:30

रूपाली देशमुख यांनी परसबागेची लागवड कशी करावी, परसबाग म्हणजे काय, याची माहिती दिली. परसबागेतून कोणता भाजीपाला पिकवला जाऊ ...

Online kitchen garden training at Krishi Vigyan Kendra | कृषी विज्ञान केंद्रात ऑनलाईन परसबाग प्रशिक्षण

कृषी विज्ञान केंद्रात ऑनलाईन परसबाग प्रशिक्षण

रूपाली देशमुख यांनी परसबागेची लागवड कशी करावी, परसबाग म्हणजे काय, याची माहिती दिली. परसबागेतून कोणता भाजीपाला पिकवला जाऊ शकतो याची माहितीही त्यांनी दिली. कुटुंबांतील सदस्यांच्या आवडीनिवडीनुसार भाजीपाला पिकांची लागवड करावी, असेही त्या शेवटी म्हणाल्या.

जयंत उत्तरवार यांनी परसबागेतील पाणी व्यवस्थापन या विषयावर माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्राने परसबागेसाठी तयार केलेली ड्रम कीटची माहिती दिली. परसबागेला कशा प्रकारे पाणी दिले पाहिजे की ज्यामुळे पाण्याची बचत होईल याविषयी त्यांनी मार्गदशन केले. आरती देशमुख यांनी आहारमध्ये भाज्याचे महत्त्व व कुपोषण या विषयवर मार्गदर्शन केले. त्यांनी कुपोषण आणि परसबागे कसा संबंध आहे हे सांगितले. पालक, मेथी, राजगिरा शेपू, आंबड चुका, कारले, काकडी, गंगाफळ, दुधी, वांगे, भेंडी, टमाटर, पपई, पेरू, सीताफळ आणि शेवगाचा पानाचा, शेगांचा आणि फुलाचासुद्धा वापर कुपोषण दूर करण्यासाठी होत असल्याची माहिती दिली.

शहरी भागात गॅलरीत कुंड्यामध्येसुद्धा भाजीपाल्याची लागवड करता येऊ शकते. यात पालक, पोकळा, कोथिंबीर यांची लागवड होऊ शकते. लहान मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला, स्तनदा माता, वृद्धांच्या आहारातील भाजीपाल्याचे महत्त्वही यावेळी पटवून देण्यात आले. या ऑनलाईन सत्रात जिल्हाभरातून महिला, पुरुष सहभागी झाले होते.

Web Title: Online kitchen garden training at Krishi Vigyan Kendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.