अक्कलकुवा जांभूळ प्रक्रिया उद्योगाचे ग्रामविकास मंत्र्यांचे ऑनलाइन उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST2021-06-05T04:22:55+5:302021-06-05T04:22:55+5:30
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, मुख्य लेखा व ...

अक्कलकुवा जांभूळ प्रक्रिया उद्योगाचे ग्रामविकास मंत्र्यांचे ऑनलाइन उद्घाटन
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल गायकवाड, जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर आदी उपस्थित होते.
जांभूळ स्ट्रीप उद्योगाच्या माध्यमातून प्रभाग संघाच्या महिलांसाठी उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासोबत जांभूळ फळाची साठवणूक करणाऱ्या महिला व शेतकऱ्यांना कच्च्या मालाची योग्य किंमत मिळवून देणे शक्य होणार आहे. जांभूळ फळ साठवणूक करणारे, फळ विक्रेते, गाव वनउपज संरक्षण समिती, जांभूळ फळावर प्रक्रिया करणारे आदी संबंधित घटकांची क्षमता बांधणीदेखील या माध्यमातून होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग संघांतर्गत १९ ग्रामसंघातील २१ गावांची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. एकूण तीन हजार ६७५ कुटुंबे आणि ३५० स्वयंसहायता समूहांचा यात समावेश आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत सहा लाख ६० हजार तर प्रभाग संघाची गुंतवणूक तीन लाख ४० हजार असे एकूण १० लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे.