जात वैधता प्रमाणपत्र कसे मिळवावे यासाठी ॲानलाइन मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST2021-02-25T04:38:49+5:302021-02-25T04:38:49+5:30
जिल्ह्यातील मागासवर्गीय उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार येथे ...

जात वैधता प्रमाणपत्र कसे मिळवावे यासाठी ॲानलाइन मार्गदर्शन
जिल्ह्यातील मागासवर्गीय उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार येथे कार्यरत असून बारावी विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रमातील मागासवर्गीय विद्यार्थी, मागास प्रवर्गातून नियुक्त असणारे अधिकारी / कर्मचारी, मागास प्रवर्गातून निवडणूक लढविणारे उमेदवार इत्यादींना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयीन गर्दी कमी करून अर्जदारांना ऑनलाइन पध्दतीने वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरिता शासनाने ऑनलाइन सुविधा ऑगस्ट २०२० पासून सुरू केलेली आहे. मात्र यावर अर्ज करतांना उमेदवारांना अनेकदा अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाइन अर्जाकरिता मोफत मार्गदर्शन वेबिनार २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होत असून झूम ॲपवर Meeting Id: 96173634174, Passcode: 813902 असा आहे.
यामध्ये अर्ज सादर कसे करावे, अर्ज सादर करताना सोबत कोणते दस्ताऐवज सादर करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारा ऑनलाइन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तेव्हा वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या मागास प्रवर्गातील उमेदवारांनी, महाविद्यालयातील प्राचार्य, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, इंटरनेट कॅफे व्यावसायिक इत्यांदीनी सदरील वेबिनारमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन समितीचे उपायुक्त राकेश पाटील यांनी केले आहे.