जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाइन मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:30 IST2021-07-29T04:30:25+5:302021-07-29T04:30:25+5:30
जिल्ह्यातील मागासवर्गीय उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यरत असून ...

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाइन मार्गदर्शन
जिल्ह्यातील मागासवर्गीय उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यरत असून बारावी विज्ञान तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातील मागासवर्गीय विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी तसेच मागास प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना समितीमार्फत जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयीन गर्दी कमी करून अर्जदारांना १ ऑगस्ट २०२० पासून ऑनलाइन पद्धतीने वैधता प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे; मात्र अर्जदारांना अर्ज करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे २९ जुलै रोजी वेबिनारच्या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कामकाजात येणाऱ्या अडीअडचणींबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
हे वेबिनार झूम ॲपवर होणार असून मीटिंगचा आयडी-९०१६७२१३५५व पासवर्ड-
क्यूएक्सक्यूएमशून्य डब्ल्यू (QxqM0w) असा आहे. तरी प्राचार्य, कर्मचारी, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक, इंटरनेट कॅफे व्यावसायिकांनी या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्जदारांनी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य सचिव राकेश पाटील यांनी केले आहे.