गांधी पुण्यतिथीनिमित्त ऑनलाइन गांधी जीवनदर्शन क्विज स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:16+5:302021-02-06T04:58:16+5:30

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या महात्मा गांधी केंद्राद्वारे ऑनलाइन गांधी जीवनदर्शन क्विज व ...

Online Gandhi Jeevandarshan Quiz Competition on the occasion of Gandhi Punyatithi | गांधी पुण्यतिथीनिमित्त ऑनलाइन गांधी जीवनदर्शन क्विज स्पर्धा

गांधी पुण्यतिथीनिमित्त ऑनलाइन गांधी जीवनदर्शन क्विज स्पर्धा

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या महात्मा गांधी केंद्राद्वारे ऑनलाइन गांधी जीवनदर्शन क्विज व महात्मा गांधी साहित्य अभिवाचन ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आली. प्रारंभी दीपक पाटील यांच्यासह प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.के. पटेल, मंडळाच्या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक मंडळ सदस्यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महात्मा गांधी अध्ययन केंद्राद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत गांधी विचार संक्रमित करण्याचे कार्य महात्मा गांधी तत्त्वज्ञान केंद्राद्वारे ऑनलाइनच्या माध्यमातून केले जात आहे. त्यास १००७ विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे संयोजक डॉ.विजयप्रकाश शर्मा यांनी दिली. कार्यक्रमासाठी प्रा.वजीह अशहर व सहकारी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Online Gandhi Jeevandarshan Quiz Competition on the occasion of Gandhi Punyatithi