कोरोनामुळे आॅनलाईन रक्षाबंधनाचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:32 IST2020-08-02T12:30:12+5:302020-08-02T12:32:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रक्षाबंधनावरही यंदा कोरोनाचे संकट ओढावले आहे. आधीच राख्या विक्रीत ३० ते ४० टक्यांची घट ...

कोरोनामुळे आॅनलाईन रक्षाबंधनाचे नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रक्षाबंधनावरही यंदा कोरोनाचे संकट ओढावले आहे. आधीच राख्या विक्रीत ३० ते ४० टक्यांची घट आली आहे. एस.टी.बस, रेल्वे बंद असल्यामुळे भाऊला बहिणीकडेही जाता येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अनेक कुटूंबांना आॅनलाईनच अर्थात व्हर्च्यूअल रक्षाबंधनावर समाधान मानावे लागणार आहे.
रक्षाबंधनानिमित्त दरवर्षी बाजारात मोठी उलाढाल होते. राख्या विक्रीसह भावाकडून बहिणीला दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंचीही उलाढाल मोठी असते. यंदा मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या सर्व बाबींवर परिणाम झाला आहे.
यंदा एस.टी.बस, रेल्वे वाहतूक सेवा बंदच आहे. खाजगी प्रवासी वाहतुकीवरही मर्यादा आहेत. त्यामुळे रक्षाबंधनासाठी भावाने बहिणीकडे जाणे किंवा बहिणीने भावाकडे येण्यावर निर्बंध आले आहेत.
त्यामुळे अनेक कुटूंब आॅनलाईनच अर्थात व्हर्च्यूअल पद्धतीनेच रक्षाबंधन साजरा करण्याची शक्यता आहे. ज्या भागात व शहरात कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणाहून येण्याला किंवा जाण्याचाही मोठा धोका असल्याने सहसा अनेकजण ते टाळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.
राख्या विक्रीवरही परिणाम
यंदा राख्या विक्रीवरही परिणाम दिसून आला. आधीच ३० जुलैपर्यंत नंदुरबारसह चार शहरांमध्ये संपुर्ण लॉकडाऊन होते. ३१ जुलै पासून बाजारपेठ सुरू झाली असली तरी बाजारात राख्या विक्रीची दुकाने तुरळकच दिसून येत आहेत.
वाहतूक बंद असल्यामुळे सुरत, इंदोर येथून राख्यांचा स्टॉक येऊ शकला नसल्यामुळे मर्यादीत स्टॉकच विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे चित्र आहे.
एकुणच यंदाचा रक्षाबंधन व्हर्च्यूअल पद्धतीनेच साजरा करण्याकडे कल राहणार असून त्यादृष्टीने अनेकांनी नियोजनही करून ठेवले आहे.