नंदुरबार प्रांतकडून जातीचा दाखला ऑनलाईन डिजीटल स्वाक्षरीने मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 13:16 IST2018-11-04T13:16:41+5:302018-11-04T13:16:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जातीचे दाखले व नॉन क्रिमिलीयरचे दाखले प्रांताधिका:यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन पद्धतने मिळणार आहे. यामुळे ...

नंदुरबार प्रांतकडून जातीचा दाखला ऑनलाईन डिजीटल स्वाक्षरीने मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जातीचे दाखले व नॉन क्रिमिलीयरचे दाखले प्रांताधिका:यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन पद्धतने मिळणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा देखील वाचणार आहे. नंदुरबार प्रांताधिकारी वान्मती सी. यांनी याबाबतची माहिती दिली.
नंदुरबार व नवापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना जातीचे दाखले व नॉन क्रिमिलीयरचे दाखले मिळविण्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागत होती. त्यामुळे वेळ व पैसा देखील खर्च होत होता. आता ती गैरसोय टाळण्यासाठी नंदुरबार प्रांताधिकारी वान्मती सी. यांनी डिजीटल स्वाक्षरीने असे दाखले ऑनलाईन वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. याआधी हे दोन्ही दाखले मिळविण्यासाठी तहसीलदार कार्यालयात सेतू तसेच ठिकठिकाणच्या आपले सरकार सेवा केंद्र व महाईसेवा केंद्रात अर्ज दाखल केले जात होते. नंतर हे दाखले तयार करून स्वाक्षरीसाठी नेत असत. तेथून स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्वाक्षरीकामी सादर करण्यात येत होते. त्यात त्रुटी निघाल्यास दाखला आणखी लांबणीवर पडायचा. या सर्व प्रक्रियेत वेळ आणि पैसा वाया जात होता. त्यामुळे प्रांताधिकारी वान्मती सी. यांनी सर्व महाईसेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र परिचालकांची बैठक घेवून ऑनलाईन दाखल्यांबाबत मार्गदर्शन केले.
ठराविक दिवसानंतर त्याच ठिकाणी डिजीटल स्वाक्षरी असलेली दाखल्याची प्रिंट उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दाखले गहाळ होणे हा विषयच संपणार असून सर्वच बाबींची बचत होणार आहे. दाखला हातोहात देणे, अजर्ट पाहिजेच या सबबी आणि प्रकार बंद होणार आहे. नंदुरबार व नवापूर तालुक्यात या नव्या प्रकाराला तात्काळ सुरूवात देखील करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.