मार्केट यार्डात हलक्या प्रतीच्या कांद्यालाही चार हजाराचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:36 IST2019-11-27T11:35:49+5:302019-11-27T11:36:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजारात कांदा दरवाढ कायम असून हलक्या प्रतीचा ओला कांदाही चार हजार रुपये प्रतिक्विंटल दरात ...

मार्केट यार्डात हलक्या प्रतीच्या कांद्यालाही चार हजाराचा भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाजारात कांदा दरवाढ कायम असून हलक्या प्रतीचा ओला कांदाही चार हजार रुपये प्रतिक्विंटल दरात व्यापारी खरेदी करुन साठा करत असल्याचे चित्र मार्केट यार्डमध्ये दिसून आल़े गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात कांदा आवक घटली होती़
दोन दिवसांपासून चांगल्या प्रतीच्या कांद्याला साडे सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने शेतक:यांनी नंदुरबार बाजाराची वाट धरली होती़ सोमवारी बाजारात तब्बल 800 कट्टे कांदा आवक झाली होती़ हा कांदा चांगल्या प्रतीचा असल्याने त्याला साडेसहा हजारार्पयत दर देण्यात आले होत़े मंगळवारीही ही स्थिती कायम राहिल अशी अपेक्षा होती़ परंतू आठवडे बाजाराच्या दिवशीच लगतच्या तालुक्यातून हलक्या प्रतीचा ओला कांदा येथे विक्रीसाठी आणला गेला़ या कांद्यालाही 3 हजार 500 ते 4 हजार असा भाव व्यापा:यांकडून देण्यात येऊन खरेदी करण्यात आली़
नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात उत्पादित होणा:या कांद्याला इंदौरच्या बाजारात सोमवारी साडेसहा हजार रुपयांच्या पुढे दर मिळाल्याने मंगळवारी सकाळपासून पुन्हा वाहने मध्यप्रदेशाकडे वळली़ यामुळे येथील बाजार समितीत दिवसभरात 400 कट्टे कांदा आवक होऊ शकली़ नंदुरबार बाजार समितीत कांदा खरेदी करण्यासाठी मोठे व्यापारी नसल्याने शेतक:यांचा जास्तीत जास्त माल खरेदी केला जावू शकत नाही़ परिणामी मोठे शेतकरी कांदा घेऊन परराज्य गाठत आहेत़ परवानाधारक व्यापा:याची नियुक्ती करण्यासाठी बाजार समिती प्रशासन गेल्या वर्षभरापासून सातत्याने प्रयत्न करुनही त्यांना यश आलेले नाही़ दरम्यान येत्या काळात नंदुरबारातील दोघे आडतदारांची येथे व्यापारी म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आह़े