नंदुरबार बाजारात आवक घसरल्याने कांद्याला प्रथमच मिळाला उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:47 IST2019-09-26T11:47:09+5:302019-09-26T11:47:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीत होणारी कांदा आवक घसरल्याने यंदाच्या हंगामात प्रथमच कांदा दर हे प्रतीक्विंटल 4 ...

Onion prices in Nandurbar market got higher for the first time | नंदुरबार बाजारात आवक घसरल्याने कांद्याला प्रथमच मिळाला उच्चांकी दर

नंदुरबार बाजारात आवक घसरल्याने कांद्याला प्रथमच मिळाला उच्चांकी दर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाजार समितीत होणारी कांदा आवक घसरल्याने यंदाच्या हंगामात प्रथमच कांदा दर हे प्रतीक्विंटल 4 हजार 200 रुपयांर्पयत गेले आहेत़ बाजारात आवकच नसल्याने सडका आणि काजळी लागलेल्या कांद्याला निम्मे दर मिळत असल्याचे चित्र सध्या बाजारात आह़े   
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागात उत्पादित केलेला कांदा शेतकरी नंदुरबार बाजार समितीत विक्रीसाठी आणतात़ हमखास दरांची शाश्वती असल्याने येथे कांदा खरेदी विक्रीतून दर दिवशी हजारो रुपयांची उलाढाल होत़े शासनाने शेतक:यांना कांदा अनुदान देण्याच्या घोषणेनंतर मात्र गेल्या सहा महिन्यात येथील कांदा बाजारपेठेला घरघर लागली आह़े यातून राज्यासोबतच जिल्ह्यातील सामान्यांना ‘कांदाटंचाई’चा सामना करावा लागत आह़े गत सहा महिन्यांपूर्वी दर दिवशी किमान 50 क्विंटलर्पयत होणारी कांदा आवक आता 20 क्विंटलवर आली आह़े शेतकरी 20 आणि 40 किलोच्या कट्टय़ात कांदा आणत आहेत़ दर दिवशी 35 ते 70 कट्टे कांदा येत असल्याने व्यापा:यांनाही अडचणी येत आहेत़ भाजीपाला बाजारात विक्री होणा:या या कांद्याला मंगळवारी दुपारी प्रतीक्विंटल 4 हजार 200 रुपयांचा दर देण्यात आला़ परिणामी बाजारात कांदा दर हे प्रतिकिलो 50 रुपये एवढे होत़े आवक होणारा हा कांदा कमी प्रतीचा असल्याने त्याची देखभाल करुन साठा करणे व्यापा:यांना जिकिरीचे जात असल्याने अनेकांकडून खरेदीही टाळली जात आह़े 
बाजारात प्रामुख्याने आवक होणारा कांदा हा रांगडा कांदा म्हणून परिचित आह़े शेतक:यांनी साठा करुन ठेवलेल्या सर्वाधिक कमी दर्जाचा कांदा येथील बाजारात विक्रीसाठी आणला जात असून कांदा अनुदान मिळत नसल्याने चांगल्या दर्जाचा कांदा राज्यातील इतर बाजारपेठ आणि परराज्यात विक्रीसाठी नेला जात आह़े यात शेतक:यांना वाहतूक खर्चाचा फटका बसत आह़े 
 

Web Title: Onion prices in Nandurbar market got higher for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.