नंदुरबारच्या बाजारात कांदा प्रथमच साडेसहा हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:18 IST2019-11-25T11:18:12+5:302019-11-25T11:18:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डात प्रथमच साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने व्यापा:यांनी कांदा खरेदी केला़ ...

Onion for the first time in Nandurbar market at 7,500 | नंदुरबारच्या बाजारात कांदा प्रथमच साडेसहा हजारावर

नंदुरबारच्या बाजारात कांदा प्रथमच साडेसहा हजारावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डात प्रथमच साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने व्यापा:यांनी कांदा खरेदी केला़ शेतक:यांना मिळालेल्या विक्रमी दरांमुळे आनंदाचे वातावरण असून सोमवारी बाजार समितीत कांदा आवक वाढण्याची शक्यता आह़े           
गेल्या तीन महिन्यांपासून नंदुरबार बाजारात कांदा आवक कमी अधिक प्रमाणात होत असल्याने कांदा दरांत चढ-उतार सुरु होत़े या चढ उतारामुळे किरकोळ बाजारातील कांदा हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे वेळोवेळी दिसून आल़े परदेशातून कांदा आयात केल्यानंतर राष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याचे दर उतरल्यानंतर नंदुरबारातही त्याचा परिणाम दिसून आला होता़ गेल्या 15 दिवसात हे दर खाली आले असतानाच नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारात कांदा दर झपाटय़ाने वाढल्यानंतर नंदुरबार बाजारात कांदा दर वाढले आहेत़ शनिवार या दरांनी विक्रमी उच्चांक गाठल्याने शेतक:यांना मोठा दिलासा मिळाला आह़े अद्यापही 15 दिवसांर्पयत ही स्थिती टिकून राहणार असल्याने शेतक:यांनी लागवड केलेल्या खरीप कांद्याला बाजारात आणण्यासाठी शेतक:यांची धावपळ सुरु आह़े यात प्रामुख्याने कांदा काढणी करुन त्याची सफाई करुन ओला कांदा बाजारात विक्रीसाठी आणला जात आह़े नंदुरबार बाजारात खरीपाच्या कांद्याला चांगले दर देण्यात येत असताना धुळे बाजारात मात्र प्रतिक्विंटल साडेपाच हजार रुपयांर्पयत कांदा खरेदी करण्यात येत असल्याने तेथील शेतकरी नंदुरबारात संपर्क करत आहेत़ परंतू येथील बाजारपेठ छोटी असल्याने व्यापा:यांना मर्यादा येत आहेत़ यामुळे पूर्व भागातील निम्मा कांदा परराज्यात रवाना होत आह़े मध्यप्रदेशातील इंदौर बाजारात शनिवारी कांदा दर हे प्रतिक्विंटल सात हजार रुपयांच्या पुढे गेले होत़े यामुळे शेतकरी रविवारी इंदौरकडे मार्गस्थ झाले आहेत़ 

नंदुरबार बाजार समितीत शुक्रवारपासून कांदा आवक तेजीत सुरु आह़े शुक्रवारी दिवसात 500 कट्टे कांदा दाखल झाला होता़ या कांद्याला 3 हजार 500 ते 4 हजार 500 असा प्रतिक्विंटल दर देण्यात आला होता़ या दरांमुळे शनिवारी पुन्हा येथे बाजार सुरु झाल्यानंतर शेतक:यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता़ यावेळी मात्र चांगल्या कांद्याला प्रतिक्विंटल 6 हजार 400 रुपये दर मिळाल्याने शेतक:यांनी आनंद व्यक्त केला होता़ रविवारी बाजार बंद असल्याने व्यवहार बंद होत़े सोमवारी हे दर कायम राहण्याची शक्यता आह़े एकीकडे बाजार समितीत कांदा चढय़ा दरांमध्ये खरेदी होत असताना दुसरीकडे किरकोळ बाजारात त्याची अधिक दरांमध्ये विक्रीची स्पर्धा सुरु आह़े चांगला कांदा थेट 90 रुपये प्रतिकिलो दरात विक्री होत होता़ 
 

Web Title: Onion for the first time in Nandurbar market at 7,500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.