न्यूबन येथे तलवारीच्या हल्लात एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:36 IST2021-03-01T04:36:15+5:302021-03-01T04:36:15+5:30
पोलीस सूत्रांनुसार, न्यूबन येथे दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दिलीप ओंकार पवार यांच्यासोबत मागील भांडणाची ...

न्यूबन येथे तलवारीच्या हल्लात एक जखमी
पोलीस सूत्रांनुसार, न्यूबन येथे दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दिलीप ओंकार पवार यांच्यासोबत मागील भांडणाची कुरापत काढून सुरेश भगवान ठाकरे व राजू सुरेश ठाकरे यांनी वाद घालण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, दोघांनी दिलीप पवार यांना दोघांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सुरेश व राजू या दोघांच्या मदतीला अन्य काही धावून आले. त्यांच्याकडून दिलीप पवार यांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीदरम्यान पवार यांच्यावर तलवारीने वार करण्यात आल्याने ते जखमी झाले. याबाबत दिलीप पवार याच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात सुरेश व राजू ठाकरे या दोघांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार ते पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.