एकेरी मार्ग व समविषम पार्र्कींग करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:32 IST2019-12-22T12:32:03+5:302019-12-22T12:32:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराची वाहतूक समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी एकरी मार्ग वाहतूक व समविषम पार्र्कींगची अंमलबजावणी करण्यात ...

One-way and one-way parking | एकेरी मार्ग व समविषम पार्र्कींग करणार

एकेरी मार्ग व समविषम पार्र्कींग करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहराची वाहतूक समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी एकरी मार्ग वाहतूक व समविषम पार्र्कींगची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शिवाय ज्या भागात अतिक्रमण असेल ते काढण्यासाठी पालिकेकडे पत्र देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले.
शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधिक्षक कार्यालयात बैठक घेण्यात आली. प्रवासी संघटना, प्रादेशिक परिवहन, नगरपालिका, टॅक्सी चालक-मालक संघटना, व्यापारी असोसिएशन अशा विविध संघटनांची बैठक बोलावून शहराच्या वाहतुकीचा मार्ग कसा मोकळा या होईल या संदर्भात चर्चा करण्यात आली.
शहरातील वाहतूक नियम, एकेरी मार्ग, सम-विषम पार्कींग, लक्झरी बसेसचा थांबा, अ‍ॅपेरिक्षा, टॅक्सी यांचा थांबा निश्चित करणे, प्रवासी वाहतूक करणारे वाहनांचे कागदपत्रे आदी नियमांवर चर्चा करण्यात आली. या संदर्भात प्रथम महाराष्ट्र व्यायाम शाळा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा एकेरी मार्ग करण्या संदर्भात निर्णय झाला. तसेच द्वारकाधीश मंदिरापासून गुरुनानक कापड बाजार, जुनी बडोदा बँक व बटेसिंगभैय्या कॉम्पलेक्स ते शास्त्री मार्केट वन-वे करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार कार्यालय, स्टेशन रोड, जुने न्यायालय, अमृत चित्र मंदिर, अमर चित्र मंदिर या भागात सम-विषम पार्कींंग करणे, असे निर्णय घेण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक पंडीत यांनी सुचित केले की, तीन सिट वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी पाच ते दहा हजाराचा दंड होईल. मुलींची छेडखानी मुळीच खपवून घेतली जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील अतिक्रमण निघत आहे. तर शहराचेही अतिक्रमण काढण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु आहे.
त्याचप्रमाणे वाहतुक शाखा व प्रवासी संघटना प्रत्येक शाळा, महाविद्यालयात जावून वाहतूकीचे नियमांसंदर्भात प्रबोधन करणार आहे, पालकांना देखील या संदर्भात वाहतूक करणाºया रिक्षा, मुलांची सुरक्षा अशा विविध विषयांवर जनजागृती करणे, लॉरीधारकांचे अतिक्रमणावर नगरपालिकेने त्वरीत लक्ष घालावे, अशा सुचना केल्या.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, वाहतुक पोलीस निरीक्षक श्रीरंग, प्रवासी संघटना अध्यक्ष गजेंद्र शिंपी, प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव, नगरपालिकेचे इंजिनिअर गावीत, व्यापारी असोसिएशनचे सुनिल सोनार, टॅक्सी चालक-मालक संघटनेचे राजेंद्र चौधरी, प्रवासी संघटनेचे सदस्य राजवीर अहिरे, विजय राठोड, रिक्षा युनियनचे किरण गवळी, गुरुनानक कापड बाजार असोसिएशनचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Web Title: One-way and one-way parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.