पथराईजवळ एकास मारहाण करुन लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:19 IST2019-07-02T12:19:50+5:302019-07-02T12:19:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाका ते पथराईदरम्यान मोटारसायकलने जाणा:या युवकाला अडवून मारहाण करत त्याची लूट केल्याची घटना 29 ...

One was beaten and looted at Pathrai | पथराईजवळ एकास मारहाण करुन लुटले

पथराईजवळ एकास मारहाण करुन लुटले

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वाका ते पथराईदरम्यान मोटारसायकलने जाणा:या युवकाला अडवून मारहाण करत त्याची लूट केल्याची घटना 29 जून रोजी दुपारी चार वाजता घडली होती़ चौघांनी युवकाचे मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या वादातून ही मारहाण केली आह़े 
महेंद्र प्रताप पाडवी हा 29 रोजी पथराई फाटय़ाजवळून जात असताना पिंटू कडू पाडवी रा़ वाका (गुजरात) याच्यासह तिघांनी थांबवल़े चौघांनी महेंद्र याला नळवे येथील युवतीसोबत असलेल्या प्रेमसंबधांची कुरापत काढून मारहाण करण्यास सुरुवात केली़ मारहाणीनंतर महेंद्र याचे चांदीचे ब्रेसलेट, मोबाईल आणि रोख रक्कम असा 14 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेत त्यांनी पोबारा केला़ याबाबत युवकाने उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पिंटू पाडवीसह अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर करत आहेत़ 
 

Web Title: One was beaten and looted at Pathrai