व्हिडिओ काढून सार्वजनिक करण्याची एकाला धमकी
By Admin | Updated: July 6, 2017 12:56 IST2017-07-06T12:56:45+5:302017-07-06T12:56:45+5:30
मारहाणीत 70 हजार लांबविले

व्हिडिओ काढून सार्वजनिक करण्याची एकाला धमकी
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.6- : व्हिडिओ शूटिंग करून ती सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याच्या वादातून एकास बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील 70 हजार रुपये रोख काढून घेतल्याप्रकरणी एकाविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 जुलै रोजी सायंकाळी ही घटना अक्कलकुवा येथे घडली.
अक्कलकुवा येथील मोलगी रस्त्यावरील मंजूर मसूद मेमन व मोहसिन रफिक मक्राणी यांच्यात चहाच्या टपरीजवळ वाद झाला. मन्सूर मसूद मेमन हा मोहसिन रफिक मक्राणी याचे व्हिडिओ शूटिंग काढून ती सार्वजनिक करण्याचे त्याला सांगत होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. मोहसिन रफिक मक्राणी याने मन्सूर मेमन याला काठीने व क्रिकेटच्या स्टम्पने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील 70 हजार रुपये रोख काढून घेतले. याप्रकरणी अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.