शहाद्यात अवघ्या पाच तासात एक हजार इन्जेक्शनी विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST2021-04-04T04:31:48+5:302021-04-04T04:31:48+5:30
नंदुरबार : कोरोना बाधित रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या रेडमीसीवर या इंजेक्शनची शहरात अवघ्या पाच तासात एक हजार व्हायल विक्री झाल्याने ...

शहाद्यात अवघ्या पाच तासात एक हजार इन्जेक्शनी विक्री
नंदुरबार : कोरोना बाधित रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या रेडमीसीवर या इंजेक्शनची शहरात अवघ्या पाच तासात एक हजार व्हायल विक्री झाल्याने शहर व तालुक्यात बाधितांची संख्या लक्षणीय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे शासकीय पातळीवर या इंजेक्शन ची किंमत कमी असली तरी गेल्या काही दिवसापासून या इंजेक्शन च्या कृत्रिम तुटवड्यामुळे औषध विक्रेत्यांकडून दोन ते चार हजार रुपयांपर्यंत विक्री केली जात होती सर्वसामान्य जनतेला हे इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी शहाद्यात सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी पी.के. अण्णा फाऊंडेशनच्या माध्यमातून अवघ्या ७७५ रुपयाला हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे.
गेल्या काही दिवसापासून शहर व तालुक्यात कोरोना विषाणू संक्रमणाचे फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याने बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे शासकीय आकडे काहीही असले तरी त्यापेक्षा अधिक बाधीत तालुक्यात असल्याची चर्चा यापूर्वी सुरू होती आज अवघ्या पाच तासात बाधितांसाठी वरदान ठरत असलेल्या रेमडीसीवर या इंजेक्शनची विक्रमी विक्री झाली आहे.
स्वस्त दरात फक्त बाधित रुग्णांनाच हे इंजेक्शन पुरवठा केले जात असल्याने एकीकडे बाधितांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले असले तरी दुसरीकडे विक्रमी विक्री झाल्याने तालुक्यात बाधितांची आजची संख्या सर्वाधिक असल्याचे स्पष्ट होत आहे शासकीय पातळीवर याची दखल घेण्यात येऊन गांभीर्याने परिस्थिती हाताळण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.