राम राम केल्याच्या वादातून एकाचा केला कपाळमोक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:10 IST2021-02-05T08:10:31+5:302021-02-05T08:10:31+5:30

नंदुरबार : मुलगा पुढारी झाला, तु कशाला राम राम करतो असे सांगून एकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा कपाळमोक्ष केल्याची ...

One of them got a forehead salvation from the argument of Ram Ram | राम राम केल्याच्या वादातून एकाचा केला कपाळमोक्ष

राम राम केल्याच्या वादातून एकाचा केला कपाळमोक्ष

नंदुरबार : मुलगा पुढारी झाला, तु कशाला राम राम करतो असे सांगून एकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा कपाळमोक्ष केल्याची घटना लिंबीपाडा, ता.अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनुसार, बिज्या मोत्या पाडवी, रा.ओहवाचा ओलखाडीपाडा, ता.अक्कलकुवा यांनी धर्मा रतन्या पाडवी, रा.ओलखाडीचापाडा यांना राम राम केला. त्याचा राग येऊन तु कशाला मला राम राम करतो, तुझा मुलगा ईश्वरसिंग बिज्या पाडवी हा मोठा पुढारी झाला आहे असे सांगून वाद घातला. वादातूनच धर्मा याने बिज्या यांच्या डोक्यात दगड घातला. त्यात त्याचे डोके फुटले. शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत बिज्या पाडवी यांनी फिर्याद दिल्याने धर्मा पाडवी यांच्याविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार प्रकाश मेढे करीत आहे.

Web Title: One of them got a forehead salvation from the argument of Ram Ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.