नवापूर पालिका पोटनिवडणुकीत काँग्रेस व भाजपला प्रत्येकी एक जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:57 IST2019-12-31T12:56:40+5:302019-12-31T12:57:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : येथील पालिकेच्या दोन जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपास प्रत्येकी एक जागा ...

One seat each for Congress and BJP in Navapur Municipality by-elections | नवापूर पालिका पोटनिवडणुकीत काँग्रेस व भाजपला प्रत्येकी एक जागा

नवापूर पालिका पोटनिवडणुकीत काँग्रेस व भाजपला प्रत्येकी एक जागा

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : येथील पालिकेच्या दोन जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपास प्रत्येकी एक जागा मिळाली.
पालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा (अ) व सात (अ) मधील काँग्रेस पक्षाच्या दोन नगरसेवकांचे इतर मागासवर्ग प्रवर्ग जात प्रमाणपत्र अमान्य करण्यात आल्याने या दोन प्रभागात पोटनिवडणुक घेण्यात आली. पोटनिवडणुकीत प्रभाग सहा मध्ये तीन उमेदवार तर प्रभाग सात मध्ये चार उमेदवारांमधे लढत झाली. काल रविवारी ५५ टक्के मतदान झाले. पालिकेच्या बहुउद्देशिय नगरभवनात आज सकाळी दहाला मतमोजणी करण्यात आली. तीन फेऱ्यात मत मोजणी पूर्ण झाली. प्रभाग क्रमांक सहा मधून महाविकास आघाडीच्या सुरेखा प्रकाश जगदाळे (काँग्रेस) १२१ मतांच्या आघाडीने विजयी झाल्या. त्यांना ८४३ मते मिळालीत. भारतीय जनता पार्टीच्या जीग्नेषा संदीप राणा यांना ७२२ मते मिळाली तर अपक्ष उमेदवार फॅमिदा फिरोज फॅन्सी यांना ३४ मते व नोटा विकल्पात २८ मते नोंदविण्यात आलीत. प्रभाग सात मधून भारतीय जनता पक्षाचे महेंद्र अशोक दुसाणे हे २२५ मतांच्या आघाडीने विजयी झाले. त्यांना ९८४ मते मिळालीत. महाविकास आघाडीचे डॉ. मनोज रमेश चव्हाण (शिवसेना) यांना ७५९ मते, अपक्ष गणेश भानुदास वडनेरे यांना ११६ मते, सुनील धाकु भोई यांना ३६ मते तर नोटा विकल्पात २१ मते पडले.
विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके फोडुन जल्लोष केला. प्रभागातील मतदारांच्या भेटी घेउन विजयी उमेदवारांनी आशिर्वाद घेतले. पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपुत यांच्या नेतृत्वात दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे पुरुष व महिला कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, सहाय्यक निवडणूक अधिकारी व पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, नायब तहसीलदार राजेंद्र नजन, पालिका अधिक्षक मिलिंद भामरे, अनिल सोनार, मनोज पाटील व सहकारी यांनी परिश्रम घेतलेत.

Web Title: One seat each for Congress and BJP in Navapur Municipality by-elections