One person was killed when a speeding two-wheeler fell between Bhaler and Akrale | भालेर ते अक्राळे दरम्यान भरधाव वेगातील दुचाकी घसरल्याने एक ठार

भालेर ते अक्राळे दरम्यान भरधाव वेगातील दुचाकी घसरल्याने एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील भालेर येथून अक्राळे गावाकडे जाताना दुचाकीच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना ३१ मे रोजी सकाळी ९ वाजता घडली होती़ याप्रकरणी सोमवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़
शोभा दगा पवार रा़ अक्राळे असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे़ शोभा पवार हा सुदाम प्रताप चव्हाण याच्यासोबत एमएच ३९ बी ९३९० या दुचाकीने ३१ मे रोजी अक्राळे येथे जात होता़ दरम्यान पवार याने भरधाव वेगात दुचाकी चालवल्याने रस्त्यावर अपघात घडला होता़ अपघातात शोभा पवार हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू तर सुदाम चव्हाण हा जखमी झाला आहे़ याबाबत सुदाम प्रताप चव्हाण यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मयत शोभा पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस नाईक वसावे करत आहेत़

Web Title: One person was killed when a speeding two-wheeler fell between Bhaler and Akrale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.