तिखोरा शिवारात गावठी दारुसह एक जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 19:34 IST2019-02-17T19:34:48+5:302019-02-17T19:34:53+5:30
नंदुरबार : शहादा तालुक्यातील तिखोरा शिवार परिसरात हातभट्टीच्या दारुसह १ लाख ६८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ...

तिखोरा शिवारात गावठी दारुसह एक जण ताब्यात
नंदुरबार : शहादा तालुक्यातील तिखोरा शिवार परिसरात हातभट्टीच्या दारुसह १ लाख ६८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ यात, एक तीन चाकी अॅपे रिक्षा व दोन सायकलींचा समावेश आहे़
कारवाईत आरोपी शेख अशपाक शेख हुसेन रा़ शहादा याला ताब्यात घेण्यात आले आहे़ रविवारी पहाटे राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका खेडदिगर ता़ शहादा नंदुरबारच्या पथकाने ही कारवाई केली आहे़ आरोपीकडे मोठ्या प्रमाणात गावठी दारु हस्तगत करण्यात आली आहे़ आरोपीवर दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ परिसरात आणखी दारुचे अड्डे आहे काय? याचा तपास करण्यात येत आहे़ कारवाई विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे व अधिक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनुपकुमार देशमाने, दुय्यम निरीक्षक अजित नायकुडे व सहाय्यक दुय्यम निरीक्षक मोहन पवार, रामसिंग राजपूत, राजेंद्र पावरा, तुषार सोनवणे, ज्ञानेश्वर सांबारे, संदिप वाघ आदींनी सहभाग घेतला़