शेतीच्या वादातून एकाचा खून

By Admin | Updated: July 7, 2017 13:01 IST2017-07-07T13:01:17+5:302017-07-07T13:01:17+5:30

शेतीच्या वादातून वेरंग्या आटय़ा पावरा (50) याच्यावर लोखंडी घणाने वार करून त्याला जागीच ठार केल्याची घटना छिनालकुवाच्या बारीपाडा शिवारात 6 रोजी सकाळी घडली.

One murder of farming | शेतीच्या वादातून एकाचा खून

शेतीच्या वादातून एकाचा खून

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार , दि.7 - शेतीच्या वादातून वेरंग्या आटय़ा पावरा (50) याच्यावर लोखंडी घणाने वार करून त्याला जागीच ठार केल्याची घटना छिनालकुवाच्या बारीपाडा शिवारात 6 रोजी सकाळी घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेरंग्या आटय़ा पावरा व रायदास गुज:या पावरा यांच्यात शेतीचा वाद होता. 6 जुलै रोजी सकाळी आठ वाजता वेरंग्या पावरा हे शेतात गेले असता, तेथे रायदास गुज:या पावरा, इंदास गुज:या पावरा, आशाबाई रायदास पावरा, होमीबाई गुज:या पावरा हे आले. त्यांनी वेरंग्या यांच्याशी वाद घालत मारहाण केली. रायदास गुज:या पावरा याने आपल्या हातातील लोखंडी घण वेरंग्या यांच्या डोक्यावर मारून जीवे ठार मारले. तेथे रेहमन पावरा हा सोडविण्यास गेला असता त्यालादेखील लोखंडी घणाने आणि दगडांनी मारून दुखापत केली.
याबाबत दारासिंग वेरंग्या पावरा यांनी फिर्याद दिल्याने रायदास गुज:या पावरा, इंदास गुज:या पावरा, आशाबाई रायदास पावरा व होमीबाई गुज:या पावरा, रा.छिनालकुवाचा बारीपाडा, ता.धडगाव यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: One murder of farming