मुंबई रिटर्नसह मयताच्या संपर्कातील एकजण बाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:21 IST2020-06-01T12:21:37+5:302020-06-01T12:21:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/बामखेडा : मुंबई रिटर्न असलेला नंदुरबारातील ४१ वर्षीय व्यक्ती आणि हिंगणी येथील बाधीत मयताच्या सोबत राहिलेला ...

One of Mayata's contacts with Mumbai returns is affected | मुंबई रिटर्नसह मयताच्या संपर्कातील एकजण बाधीत

मुंबई रिटर्नसह मयताच्या संपर्कातील एकजण बाधीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार/बामखेडा : मुंबई रिटर्न असलेला नंदुरबारातील ४१ वर्षीय व्यक्ती आणि हिंगणी येथील बाधीत मयताच्या सोबत राहिलेला त्याचा २८ वर्षीय पुतण्या अशा दोघांचा अहवाल रविवारी रात्री पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या ३४ झाली आहे.
नंदुरबारातील नागाई नगरात राहणारा व मुंबई येथून आलेला ४१ वर्षीय व्यक्तीला त्रास झाल्याने खाजगी रुग्णालयात दाखल झाला होता. तेथून त्यांचे स्वॅब जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. ते होम क्वॉरंटाईन होते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याशिवाय हिंगणी येथील मुंबई रिटर्न मयत शिक्षकाचा पुतण्या देखील पॉझिटिव्ह झाला आहे. मयत शिक्षकासोबत खाजगी रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात हा २९ वर्षीय युवक सोबत होता. त्याचाही स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो संस्थात्मक क्वॉरंटाईन होता. आता त्यालाही जिल्हा रुग्णालयात कोवीड कक्षात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, नंदुरबार येथील नागाई नगर भागातील परिसर सील करून प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे.
या भागात महसूल, आरोग्य व पोलीस विभागाने जावून रात्री उशीरापर्यंत विविध ठिकाणी बॅरीकेटींग केले. बाधीताच्या कुटूंबातील व्यक्तींनाही क्वॉरंटाईन करण्यात आले.

Web Title: One of Mayata's contacts with Mumbai returns is affected