शहाद्यातील एक जण नाशिकला कोराना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 13:16 IST2020-07-13T13:16:25+5:302020-07-13T13:16:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील वृंदावननगरमधील रुग्ण गेल्या १५ ते २० दिवसांपासून नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत ...

One of the martyrs attacked Korana in Nashik | शहाद्यातील एक जण नाशिकला कोराना बाधित

शहाद्यातील एक जण नाशिकला कोराना बाधित

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील वृंदावननगरमधील रुग्ण गेल्या १५ ते २० दिवसांपासून नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. काही कामानिमित्त बऱ्याच दिवसापासून ते नाशिक येथेच होते. त्यांना तेथे त्रास जाणवायला लागल्याने रुग्णालयात दाखल झाले असताना त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरातील त्यांच्या परिवारातील मुलगा, सून व नातू या तिघांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
शहरात कोरोना रुग्णांचा आलेख वाढत चालला असून प्रशासन हतबल झाले आहे. रोज किंवा एक दिवसाआड रुग्ण वाढत आहेत. बाहेरगावाच्या रुग्णांशी संपर्क वाढत असल्याने ही समस्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. शनिवारी रात्री नाशिक येथून शहादा येथील आरोग्य विभागाला वृंदावननगर येथील रुग्णाबाबत कळविण्यात आले. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ त्यांच्या कुटुंबातील तीन जणांना होम क्वारंटाईन केले आहे. आधीच वृंदावननगरमधील एका पॉझिटीव्ह रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. याबाबत अधिक माहिती मिळवली असता शनिवारी नाशिक येथून अहवाल आलेल्या रुग्णाचा शहरातील नागरिकांशी संपर्क आलेला नसून फक्त परिवाराशी संपर्क आलेला आहे. त्यामुळे वृंदावननगरमधील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: One of the martyrs attacked Korana in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.