जिल्ह्यात लसीकरणाचा एक लाखांचा टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:33 IST2021-04-23T04:33:15+5:302021-04-23T04:33:15+5:30
एकूण ७९ हजार ३८६ व्यक्तींना लसींची पहिली मात्रा, तर २१ हजार ६४६ व्यक्तींना दुसरी मात्रा अशा एकूण एक ...

जिल्ह्यात लसीकरणाचा एक लाखांचा टप्पा पार
एकूण ७९ हजार ३८६ व्यक्तींना लसींची पहिली मात्रा, तर २१ हजार ६४६ व्यक्तींना दुसरी मात्रा अशा एकूण एक लाख एक हजार ३२ चा टप्पा या लसीकरण मोहिमेने पूर्ण केला आहे. १४ हजार ३७३ मात्रा कोव्हॅक्सिनच्या तर ८६ हजार ६६० मात्रा कोविशिल्डच्या देण्यात आल्या. लसींच्या ५४ हजार ८१८ मात्रा पुरुषांना, तर ४६ हजार २१४ मात्रा महिलांना देण्यात आल्या.
ग्रामीण भागात तसेच अधिक कोरोनाबाधित आढळणाऱ्या भागात विशेष मोहीम राबवून लसीकरणाला वेग देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी स्थानिकांचे सहकार्य घेण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी विशेष पथकांची स्थापना करून लसीकरणाला वेग देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.