जिल्हातील एक लाख ९२ हजार आज चिमुकल्यांना दोन थेंब जीवनाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST2021-02-05T08:09:46+5:302021-02-05T08:09:46+5:30

नंदुरबार : ३१ जानेवारीचा रविवार हा पोलिओ रविवार म्हणून पाळण्यात येणार आहे. जिल्हाभरातील शून्य ते पाच वर्ष वयोगटांतील एक ...

One lakh 92 thousand in the district today two drops of life to Chimukalya | जिल्हातील एक लाख ९२ हजार आज चिमुकल्यांना दोन थेंब जीवनाचे

जिल्हातील एक लाख ९२ हजार आज चिमुकल्यांना दोन थेंब जीवनाचे

नंदुरबार : ३१ जानेवारीचा रविवार हा पोलिओ रविवार म्हणून पाळण्यात येणार आहे. जिल्हाभरातील शून्य ते पाच वर्ष वयोगटांतील एक लाख ९२ हजार बालकांना पोलिओ लस पाजली जाणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी ही मोहीम राबविली जाणार होती, परंतु कोरोना लसिकरणामुळे ती पुढे ढकलण्यात आली.

रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात या मोहिमेचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हाभरातील एक हजार ९९५ केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. वीटभट्टी, रेल्वे व बसस्थानक यासह इतर ठिकाणीदेखील लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक कर्मचारी व वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अशी असेल पोलिओ लसीकरण मोहीम...

ऊसतोड कामगार, विटभट्टी मजूर, बांधकाम व रस्त्यावरील कामे करणारे मजूर यांच्या मुलांच्या नोंदणीकडे विशेष लक्ष देऊन त्यांना पोलिओ लस दिले जाणार आहे.

एकूण चार हजार ८०७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात ग्रामीण भागात ४,४७०, तर शहरी भागात ३३७ कर्मचारी यांचा समावेश राहणार आहे.

पर्यवेक्षकांमध्ये ग्रामीण भागात ३७६, तर शहरी भागात २९ असे एकूण ४०५ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. सर्व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले गेले आहे.

गृहभेटीद्वारेदेखील लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी २,९७६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पर्यवेक्षकांची संख्या ३१४ इतकी आहे. तीन दिवस १,४८८ पथके राहणार आहेत.

Web Title: One lakh 92 thousand in the district today two drops of life to Chimukalya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.