कोपर्ली-बह्याणे दरम्यान दुचाकी धडकून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:57 IST2021-02-03T12:56:54+5:302021-02-03T12:57:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील कोपर्ली ते बह्याणे रस्त्यावर दोन मोटारसायकली एकमेकांवर धडकून झालेल्या अपघातात एक ठार त ...

कोपर्ली-बह्याणे दरम्यान दुचाकी धडकून एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील कोपर्ली ते बह्याणे रस्त्यावर दोन मोटारसायकली एकमेकांवर धडकून झालेल्या अपघातात एक ठार त एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. अपघातात दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
कोपर्ली येथील द्वारकानाथ माणकलाल बिर्ला (वय ५८) हे एमएच ३९ एक्स ५९७९ या मोटारसायकलने कोपर्ली गावाकडे येत असताना बह्याणे गावाजवळ एमएच १८ बीजे ३३७९ या समोरुन येणा-या मोटारसायकलीने त्यांना धडक दिली. धडकेत द्वारकानाथ बिर्ला हे गंभीर जखमी होवून ठार झाले. तर दुचाकीस्वार भरत नारायण पवार रा. नेवाडे ता. साक्री व बबलू दाैलत पाटील हे दोघेही जखमी झाले.
याबाबत शंतनू बिर्ला रा. कोपर्ली यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन धडक देणारा दुचाकीस्वार भरत नारायण पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक गावीत करत आहेत. अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले आहे. दोघा जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.