वाका-नंदुरबार रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत एक ठार दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:30 IST2019-08-19T12:30:22+5:302019-08-19T12:30:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाका ते नंदुरबार रस्त्यावर पथराई फाटय़ाजवळ समोरुन येणा:या पीकअप वाहनाला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने ...

वाका-नंदुरबार रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत एक ठार दोघे गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वाका ते नंदुरबार रस्त्यावर पथराई फाटय़ाजवळ समोरुन येणा:या पीकअप वाहनाला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने 1 ठार तर दोघे गंभीर जखमी झाल़े 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला़
विजेंद्र सत्कार मोरे (28) रा़ सुंदर्दे हा युवक 16 रोजी एमएच 04 एफडी 6775 या पीक अप वाहनाने नंदुरबार शहराकडे येत असताना पथराई फाटय़ाजवळ आरजे 06 जीसी 2573 या कंटेनरने पिकअपला समोरुन धडक दिली़ धडकेत पीकअप चालक विजेंद्र मोरे हा जागीच ठार झाला़ तर सोबत असलेले रोहित शांतीलाल वसावे आणि सुनिल उर्फ चुनीलाल वसावे रा़ नारायणपूर हे दोघेही गंभीर जखमी झाल़े अपघातानंतर कंटेनरचालक नानेराम गंगाराम गुजर रा़ रघुनाथपुरा, राजस्थान हा घटनास्थळावरुन पसार झाला़ घटनेनंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी भेट देत माहिती जाणून घेतली होती़ अपघातानंतर पोलीसांनी चौकशी करुन दोषी कंटेनर चालकविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली़
याबाबत उपनगर पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास सोमनाथ मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चालक नानेराम गुजर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल सजन वाघ करत आहेत़ अपघातात जखमी झालेल्या दोघांना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आह़े
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद असल्याने गुजरात राज्याकडे जाणारी व तेथून येणारी वाहने नंदुरबार मार्गाने वळवण्यात आली आह़े विसरवाडीकडून येणारी वाहने नंदुरबार मार्गाने वाका चारस्त्याकडे जात आहेत़ यातून मार्गावर वाहनांची संख्या वाढून अपघातातही वाढ झाली आह़े खड्डेमय आणि अरुंद रस्त्यांवर अवजड वाहनांचा वेग अधिक आह़े