प्रकाशानजीक अपघातात एक ठार, दोन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST2021-09-05T04:34:01+5:302021-09-05T04:34:01+5:30
पिंटू मंगल भिल, रा.प्रकाशा असे मयताचे नाव आहे. तर पिंटू नरू भिल व अर्जुन बुध्या भील असे जखमींची नावे ...

प्रकाशानजीक अपघातात एक ठार, दोन जण जखमी
पिंटू मंगल भिल, रा.प्रकाशा असे मयताचे नाव आहे. तर पिंटू नरू भिल व अर्जुन बुध्या भील असे जखमींची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, पिंटू मंगल भिल मासेमारी करण्यासाठी स्वतःचा मोटारसायकलने (एमएच१५-ए.वाय.८७२६) पिंटू भिल व अर्जुन भिल यांच्यासोबत जात होता. तापी काठावरील आसाराम बापू आश्रम च्या गेट समोर रोडवर नंदुरबारकडून आलेल्या भरधाव कारने (क्रमांक एमएच १२ जी.व्ही.२०६०) जबर धडक दिली. त्यात तिन्ही युवक फेकले गेले. पिंटू भिल यास जबर मार लागल्याने त्यास व इतर दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. इतर दोन्ही युवकाची प्रकृती स्थिर आहे. तपास जमादार सुनील पाडवी करीत आहे.
घराचा कर्ता पुरुष गेला
पिंटू मंगल भिल घरातील कर्ता पुरुष होता. घरी पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई, वडील असे एकत्र कुटुंब राहते. मासेमारी तथा इतर वेळेला मोल मजुरीचे काम करणारा पिंटू अपघातात गेल्याने घरातील उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.