शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

कार-दुचाकी अपघातात एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/कळंबू : सारंगखेडा ते कुकावल रस्त्यावर भरधाव मोटारसायकलने चारचाकीला धडक दिल्याने एक ठार तर दोघे जण ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/कळंबू : सारंगखेडा ते कुकावल रस्त्यावर भरधाव मोटारसायकलने चारचाकीला धडक दिल्याने एक ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.मंगळवारी सायंकाळी कुकावल गावाकडून सारंगखेड्याकडे जाणा-या एमएच ३९ जी २४४७ या वाहनाला कळंबूकडून भरधाव वेगात येणा-या मोटारसायकलीने धडक दिली. भरधाव वेगात असलेल्या या दुचाकीवर तिघे जण होते. धडक जोरदार असल्याने तिघेही लगतच्या चारीत फेकले गेले तर चारचाकी वाहनाची एअरबॅग निघून चारचाकी चालक त्यातून बचावला. या अपघातात मोटारसायकलवरील  वर्षीय अजय गुलाब पावरा (२०) हा युवक जागीच ठार झाला तर अजय युवराज गवळे (वय २०) आणि अजय सुमेरसिंग बागुल (वय २४) हे दोघेही गंभीर जखमी झाले. कळंबू गावालगत झालेल्या अपघाताची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट देत जखमी आणि मयताची ओळख पटवली. याबाबत अविनाश सुरेश बागुल यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन कारचालक राकेश भटू सनेर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जखमींना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर डाॅ. पवन बेहरे यांनी प्रथमोपचार पूर्ण केले.   मृतदेह पालकांना सोपवण्यात आला. त्याच्या कुटूूंबियांचा यावेळी शोक अनावर झाला होता. अपघातातील तिघेही युवक हे कुकावल येथील रहिवासी आहेत. मंगळवारी सारंगखेडा येथे दुचाकीने खाजगी कामासाठी आले होते. तिघांचे प्रथम नाव अजयच असल्याने त्यांच्या मैत्रीची नेहमीच चर्चा होती.