नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर बसची दुचाकीला धडक, एक ठार तर गंभीर दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST2021-09-02T05:05:24+5:302021-09-02T05:05:24+5:30

मंगळवारी सकाळी गुजरात राज्य परिवहन महामंडळाची जीजे १८ झेड ५६५० मालेगाव-सुरत ही बस घोडजामणे गावाजवळ पुढे चालणाऱ्या रिक्षाला ...

One killed, two injured in bus collision on Navapur-Pimpalner road | नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर बसची दुचाकीला धडक, एक ठार तर गंभीर दोघे जखमी

नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर बसची दुचाकीला धडक, एक ठार तर गंभीर दोघे जखमी

मंगळवारी सकाळी गुजरात राज्य परिवहन महामंडळाची जीजे १८ झेड ५६५० मालेगाव-सुरत ही बस घोडजामणे गावाजवळ पुढे चालणाऱ्या रिक्षाला ओव्हरटेक करत होती. दरम्यान समोरुन एमएच ३९ एजी ७९६३ ही दुचाकी समोर येत होती. बसचालकाला अंदाज न आल्याने त्याने दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर दुचाकी थेट बसखाली गेली. यावेळी दुचाकीवर असलेले तिघेही त्यात दाबले गेले. यातून कोट्या माैल्या मावची (४०) रा.बेडकीपाडा तर विक्रम श्रीराम मावची रा. बेडकीपाडा व विजेंद्र दिलीप गामित रा. वागदा हे दोघे गंभीर जखमी झाले.

दुचाकीवरील तिघेही नवापूर तालुक्यातील बोकळझर येथे अंत्यविधीसाठी जात असताना हा अपघात घडला. दुचाकी बसच्या पुढच्या चाकात तर मयत आणि जखमी बसच्या खाली सुमारे तासभर होते. जखमी विव्हळत असतानाही त्यांना बाहेर काढणे जिकिरीचे झाले होते. अपघातानंतर बसचे मागचे चाक हे रस्त्याखाली जावून चिखलात फसल्याने जखमींना बाहेर काढणे शक्य होत नव्हते. दरम्यान स्थानिकांनी तातडीने जेसीबी मागवून बस ओढून घेत दोन्ही जखमींवर मयताचा मृतदेह बाहेर काढला.

दाेघा जखमींना तातडीने नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचार करुन त्यांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान अपघातामुळे नवापूर-पिपंळनेर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला करुन गर्दी हटवत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी मदतीने तात्काळ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मयत आणि जखमींच्या नातेवाईकांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात बस चालक अस्लम दाऊद उमरजी रा. सुरत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकड करत आहे.

Web Title: One killed, two injured in bus collision on Navapur-Pimpalner road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.