ट्रक-मोटारसायकल अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:16 IST2021-02-15T12:16:15+5:302021-02-15T12:16:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्रकाशा रस्त्यावरील शिरूड चौफुलीजवळ ट्रक व मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी ...

One killed in truck-motorcycle accident | ट्रक-मोटारसायकल अपघातात एक ठार

ट्रक-मोटारसायकल अपघातात एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : प्रकाशा रस्त्यावरील शिरूड चौफुलीजवळ ट्रक व मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. जखमी युवकाला सुरत येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, शिरूड चौफुली लगतच्या दोन्ही बाजूला बेकायदेशीर अतिक्रमण वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून याठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी होत आहे.
शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रकाशाकडून शहादाकडे पपईने भरलेला ट्रक (क्रमांक जी.जे. ०१ सीटी १३३९) भरधाव वेगाने येत असताना शिरुडकडून शहाद्यात येणारे मोटारसायकलस्वार (क्रमांक एम.एच.३९ पी- ६९६३)  चौफुली रस्ता ओलांडत असताना ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात मोटारसायकलवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. त्यातील पुरुषोत्तम हिरामण  पाटील (४६, रा.गांधी चौक, शहादा) यांना उपचारासाठी धुळे येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर विलास लिमजी पाटील (५०, रा.मलोणी) यांच्यावर शहादा येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी सुरत येथे खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. घटनेचे वृत्त कळताच शहरातील गुजर गल्लीतील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली.  शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तुषार पाटील, प्रशांत पाटील, भरत पाटील, मिलिंद पाटील, संदीप पाटील, मुन्ना पाटील, कमलेश पाटील, यशवंत पाटील, सुरेश पाटील, गिरीश पाटील, हर्षल पाटील,  बादल गिरासे, कृष्णा पाटील यांच्यासह अनेक युवकांनी जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्याच्या कामाची गती वाढली असून प्रकाशा ते शहादा रस्त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यात शिरुड चौफुलीवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेकायदेशीर अतिक्रमण वाढल्याने व काहींनी प्लॅस्टीक कागद टाकून मोठमोठ्या टपऱ्या उभारल्या आहेत. त्यामुळे समोरुन येणारे वाहन दिसत नसल्याने याठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शिरूड चौफुली श्री स्वामी विवेकानंद बसथांबा हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरत असल्याने बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची मागणी होत आहे.

Web Title: One killed in truck-motorcycle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.