One killed in tractor collision | ट्रॅक्टरच्या धडकेत तळोद्यात एक ठार

ट्रॅक्टरच्या धडकेत तळोद्यात एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव वेगातील ट्रॅक्टरच्या धडकेत सायकलस्वार युवक ठार झाल्याची घटना तळोदा शहरातील सुशिल नगरात मंगळवारी सायंकाळी घडली़
शैलेश राज्या पाडवी (१७) रा़ सितापावली असे मयत युवकाचे नाव असून तो मंगळवारी सायंकाळी सायकलीने अक्कलकुवा-शहादा वळणरस्त्याने सुशील नगरात जात होता़ यादरम्यान मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने शैलेश याच्या सायकलीस धडक दिली़ यात त्याचा मृत्यू झाला़ अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला़ याबाबत जंगलसिंग मंगलसिंग पाडवी रा़ तळोदा याने तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात ट्रॅ्क्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वळवी करत आहेत़

Web Title: One killed in tractor collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.